निवांत समय

January 13, 2014

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

माणुसकी आणि भावना मरत चालल्याय का ?

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

मागच्या आठवड्यात सौ आणि लेकीला घेऊन फिरायला जाताना आमच्या कॉलोनी च्या कॉर्नर वरतीच गर्दी दिसली, मीही मनुष्य योनितला असल्यामुळे साहजिकच थांबलो, बघतो तर काय, एका आपे रिक्श्याने एका जुन्या एस्टीम ला धडक दिली होती आणि त्या चारचाकी मधले एक दक्षिण भारतीय जोडपे त्या रिक्श्यावाल्याबरोबर तावातावाने भांडत होते. तसे पहिले तर ते जोडपे हि वयस्कर होते आणि त्यांची परिस्तिथी पण चांगली होती. तो रिक्श्यावाला पण म्हातारा होता परंतु गरीब दिसत होता. बरीच मंडळी जमली होती. ती स्त्री पोलिसात तक्रार दाखल करण्याविषयी बोलत होती तर काही लोक मिटउन घेण्यास सांगत होते.

by वात्रट मेले at January 13, 2014 08:39 AM

संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]

११८७. जीवेन तुलितं प्रेम सखि मूढेन वेधसा |

लघुर्जीवो ययौ कण्ठं गुरु प्रेम हृदि स्थितम् ||

अर्थ

अगं सखे; त्या मूर्ख ब्रह्मदेवाने प्राण आणि प्रेम यांची तुला केली, [एका पारड्यात जीव आणि माझं प्रेम दुसऱ्या पारड्यात] तर प्रेमाच्या मानाने हलका प्राण [विरहाने] कंठाशी आला. प्रेम मात्र वजनदार असल्यामुळे हृदयात आहेच.

by मिलिंद दिवेकर (noreply@blogger.com) at January 13, 2014 04:29 AM

सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

एक संवाद

ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा
___________________________________________

"शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली.

"कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

by शुचि at January 13, 2014 03:24 AM

डीडीच्या दुनियेत

January 12, 2014

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)

इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
बेलिंडा रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
कार्ड़याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़
त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रेगनचे कस्टर्ड
.
कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार
अंगावरती खवले त्याची नखे धारदार
मुख त्याचे आग ओके नाक धूर फेके
त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे
.
बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार

लेखनविषय:: 
काव्यरस: 

by शुचि at January 12, 2014 04:48 PM

आनंदघन

स्मृती ठेवुनी जाती - ९ विनय आपटे


सुमारे चाळीस वर्य़ांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले त्या काळात त्याचे कार्यक्रम रोज फक्त चार तासाएवढेच असायचे. तेवढ्यातच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये बातम्या, मुलाखती, चर्चा, समाजाचे प्रबोधन, माहिती देणे आणि मनोरंजन वगैरे सगळे चालत असे, शिवाय काही नियमित गुजराती कार्यक्रम आणि सिंधी, पंजाबी, बंगाली वगैरे अन्य भाषांमधले काही नैमित्यिक कार्यक्रम यांचाही समावेश असायचा. एकाहून जास्त भाषांमधल्या कार्यक्रमांचे नियोजन, निवेदन आणि त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणारी काही चतुरस्र मंडळी त्या काळात दूरदर्शनवर काम करायची. सुहासिनी मुळगावकर, विजय राघव राव, तबस्सुम, टी पी जैन यांच्यासारखे मातब्बर कलाकार यातल्या काही कार्यक्रमांमध्ये जीव ओतून काम करायची. त्या काळाच्या सुरुवातीला भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील ही नावे बाहेरच्या जगात फार मोठी नव्हती, पण पुढे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात गरुडभरारी घेऊन यशाचे शिखर गाठले. अरुण काकतकर आणि विनय आपटे यांच्यासारखे उत्साही नवयुवक त्या काळात दूरदर्शनवर आले, त्यांना चांगल्या संधी मिळत गेल्या आणि त्यांनी त्याचे सोने करून या माध्यमावर आपला ठसा उमटवला. अरुणशी माझा आधीपासून परिचय होता, विनयचे नाव मी ऐकले नव्हते.

त्यापूर्वी मी जितक्या आपट्यांना पाहिलेले होते त्यातले बहुतेक सगळे गोरे पान, रूपाने सुरेख, मृदुभाषी किंवा गोडबोले, व्यवहारी, पॉलिश्ड, वेल मॅनर्ड वगैरे गुणांनी युक्त असे 'मोजून मापून कोकणस्थ' होते. नंतरच्या आयुष्यातसुद्धा या वर्णनात बसणारे काही आपटे माझ्या जीवनात आले. विनय आपटे मात्र त्या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा होता. मी त्याचे नाव पहिल्यांदा श्रेयनामावलीत वाचले तेंव्हा माझ्या वाचण्यातच काहीतरी गफलत झाली असावी असे मला वाटले होते. पण पुन्हा एकदा त्याचे नाव लक्षपूर्वक वाचल्यानंतर त्याची खात्री झाली. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे संयोजन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन वगैरे बाबतीत विनय आपटेचे नाव येत असेच, तो काही वेळा निवेदनही करत असे आणि नाटिकांमध्ये भूमिकाही करत असे. यामुळे तो 'पडद्याआडला कलाकार' न राहता छोटा पडदा चांगला गाजवत होता. नाटकातला 'चॉकलेट हीरो' किंवा त्याचा अतीप्रेमळ मित्र, भाऊ अशा प्रकारच्या सोज्ज्वळ भूमिकेत त्याला कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. त्याने साकार केलेल्या भूमिकांमध्ये अनेक वेळा काही वेगळ्याच प्रकारची माणसे असायची. त्यांच्यात एक प्रकारचा रगेलपणा, उद्धटपणा, कावेबाजपणा, खुनशीपणा अशा प्रकारच्या गडद छटा असायच्या आणि विनय त्या अप्रतिम रंगवत असे. त्याचा रोल लहान असला तरी तोच अधिक प्रभावी होत असल्यामुळे लक्षात रहात असे. त्याने साकारलेल्या सज्जन माणसांच्या भूमिकांमध्येसुद्धा त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात प्रचंड इंटेन्सिटी दिसत असे. त्या भूमिकात असतांना तो जे काही बोलतो आहे तो नाटकाचा भाग असला तरी त्यातली तळमळ किंवा कळकळ अतीशय खरी वाटत असे. कदाचित त्या भूमिकांमधून त्याची जी प्रतिमा तयार झाली होती तिचा परिणाम 'विनय आपटे' या व्यक्तीची जी प्रतिमा मनात तयार होत होती त्यावर झाला असण्याची शक्यता आहे. त्याची भूमिका असो वा नसो, त्याचे दिग्दर्शन किंवा निर्मिती असली तरी ती कृती उच्च दर्जाची असणार याची खात्री असायची आणि तो कार्यक्रम आम्ही आवर्जून पहात असू. अनेक वर्षे दूरदर्शनवर नोकरी केल्यानंतर त्याने तिला रामराम ठोकला आणि स्वतःचे स्वतंत्र करीयर सुरू केले. त्यानंतर तो दूरदर्शनवर अगदी रोज दिसत नसला तरी नाटके, मुलाखती वगैरेंमधून दिसत होताच.  

श्री.सुधीर दामले त्या काळात 'नाट्यदर्पण' नावाचे एक मासिक चालवत होते. त्याला जोडून त्यांनी 'नाट्यदर्पण रजनी' सुरू केली. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात 'फिल्मफेअर अॅवॉर्ड्स'चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या 'नाट्यदर्पण सन्मानचिन्हां'ना मिळाले होते. त्या रजनीचा भव्य आणि दिमाखदार सोहळा दर वर्षी साजरा होत असे. मीसुद्धा तो कार्यक्रम सहसा चुकवत नव्हतो. माझा कलाक्षेत्राशी कसलाच थेट संबंध नव्हता, पण मराठ्यांच्या सैन्याबरोबर बाजारबुणगेही जात असत त्याप्रमाणे मीसुद्धा ओळखीच्या जोरावर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या घोळक्यात शिरत होतो. त्या रात्री आपापल्या नाटकांचे प्रयोग न ठेवता झाडून सारे कलाकार त्या सोहळ्याला हजर रहात. त्यांना जवळून आणि त्यांच्या नैसर्गिक पेहरावात आणि स्वरूपात पहावे एवढाच त्यात उद्देश असायचा. त्या घोळक्यात विनय आपटे असायचाच आणि हमखास आपल्याकडे लक्ष वेधून घेतच असे. कोणा समायिक स्नेह्याने आमची कधी औपचारिक ओळख करून दिली होती की नाही हे मला नीटसे आठवत नाही, आमची क्षेत्रे वेगळी असल्याने संभाषणही झाले नसावे, पण माझ्या दृष्टीने तो एक 'माहितीतला माणूस' ('नोन परसन') मात्र झाला होता.

अशा प्रकारच्या खाजगी मेळाव्यातलाच एक प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे. त्या काळात त्याने दूरदर्शनमधली नोकरी सोडून स्वतंत्र बस्तान बसवले होते, पण त्याचे काही सहकारी मित्र अजून तिथे काम करत होते किंवा त्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'पाट्या टाकत' होते. नव्या जीवनात विनयचे कसे काय चालले आहे? असे त्त्यांच्यातल्या कोणी त्याला विचारताच विनयने सांगितले, "अरे माझे काय विचारतोस? तू सुद्धा ही नोकरी सोडून स्वतंत्र हो, आज तुला जितका पगार मिळतोय् तितका इनकम टॅक्स तू पुढच्या वर्षी भरला नाहीस तर मी नाव बदलीन." त्या मित्राने लगेच दूरदर्शनमधली 'सरकारी नोकरी' सोडली की नाही याचा पाठपुरावा काही मी केला नाही, पण ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर दूरदर्शनवर नाव कमावलेले होते अशातली काही नावे गळत गेली एवढे मात्र खरे.

पुढल्या काळात विनयने केलेली काही नाटके गाजली, मराठी चित्रपटांमध्ये तो दिसायचाच, काही वेळा अवचितपणे हिंदी सिनेमातसुद्धा दर्शन द्यायचा तेंव्हा अभिमान वाटत असे. त्याने अनेक चांगल्या कलाकारांमधले गुण पारखून त्यांना संधी दिली होती, मार्गदर्शन केले होते आणि पुढे आणले होते. त्यांच्या मुलाखतींमध्ये ते विनयचा आदराने उल्लेख करतांना दिसत. या क्षेत्रात त्याने स्वतःचे एक वेगळे उच्च स्थान तयार केले होते आणि ते टिकवून ठेवले होते. त्याच्या फक्त नावातच 'विनय' आहे असा विनोद काही वेळा केला जात असला, तरी त्याच्या वागण्यात अत्यंत आपुलकी आणि सौजन्य असल्याशिवाय त्याने इतकी माणसे जोडून ठेवलेली असणे शक्यच नाही.

टीव्हीवर वर्षानुवर्षे लांबण लावत चालवलेल्या बहुतेक मालिका मला कंटाळवाण्या वाटतात, मी कुठलीच मालिका न चुकवता आवर्जून पहात नाही. पण काही दिवसापूर्वीच एका मालिकेतली खास व्यक्तीरेखा साकार करतांना विनयला पाहिले होते आणि त्या मालिकेत तो रंगत आणणार याची खात्री वाटत होती. त्यानंतर अगदी ध्यानीमनी नसतांना एकदम त्याच्या देहांताचीच बातमी आली. असे काही घडू शकणार असेल अशी पुसटशी कल्पना कधी मनात आली नव्हती. आपल्याहून वयाने लहान असलेल्या कोणालाही असे अचानक सोडून जातांना पाहिले तर त्याचा जास्त धक्का बसतो. त्यातही तो त्या काळात सक्रिय असला तर तो आणखी तीव्र होतो आणि तो जर विनय आपटेसारखा 'त्याच्यासारखा तोच' असला तर मग ते पचवणे असह्य होऊन जाते. अशी अद्वितीय माणसे जी स्मृती मागे ठेवून जातात ती कधीच पुसट होण्यासारखी नसते.

by Anand Ghare (noreply@blogger.com) at January 12, 2014 04:14 PM

खगोल विश्व

अंतराळात नव्या ग्रहाचा शोधपीटीआय, वॉशिंग्टन:

खगोलवैज्ञानिकांनी मीन तारकासमूहात गुरूपेक्षा दुप्पट वस्तुमानाचा ग्रह शोधून काढला आहे. या तारकाप्रणालीत एका ताऱ्याभोवती हा नवीन ग्रह फिरत असून आपल्या सौरमालेच्या शेजारी बहुतारकीय प्रणालींचे प्रमाण जास्त असताना ही एकतारकीय प्रणाली वेगळी ठरली आहे. एक तारकीय प्रणालीतील ताऱ्यांची निर्मिती ही बहुतारकीय प्रणालीपेक्षा वेगळ्या पद्धतीने होत असते, असे सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ स्फीफन केन यांनी सांगितले. 
बहुतारकीय प्रणालीत एकापेक्षा दोन ग्रहीय चकत्या असतात, त्यात ग्रहांचा जन्म होतो. एखादा जादाचा तारा हा विध्वंसक ठरू शकतो व त्याचे गुरूत्व प्राथमिक रूपातील ग्रहांना एकमेकांपासून दूर लोटू शकते. बहुतारकीय प्रणालीत फार कमी सौरमालाबाह्य़ग्रह सापडले आहेत; पण ते आहेत हे मात्र नक्की, असे ते म्हणाले.
केन यांनी हवाई येथील जेमिनी नॉर्थ ऑब्झर्वेटरी येथे ऑप्टिकल इमेजिंग तंत्राने चार तारकीय प्रणालींचा अभ्यास केला. प्रत्येक प्रणालीत त्यांना सौरमाला बाह्य़ ग्रह सापडले व त्यांच्या त्रिज्यात्मक वेगातील बदल पाहून कुठला तारा पृथ्वीपासून किती दूर व किती जवळ जात आहे, याचा अभ्यास त्यांनी केला.
शोध सुरूच..
जवळच्या पदार्थामुळे एखाद्या ताऱ्यावर जे गुरूत्वीय बल कार्य करीत असते त्यामुळे ग्रहांवर जी क्रिया घडते त्याला 'वुबलिंग' असे म्हणतात. केन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या तारकीय प्रणालींचा अभ्यास केला त्यात त्रिज्यात्मक वेगाच्या बदलातील माहितीचे स्पष्टीकरण काही बाबतीत परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या गुरूत्वाच्या आधारे करता आले नाही.

by सागर भंडारे (Sagar Bhandare) (noreply@blogger.com) at January 12, 2014 11:45 AM

नरेन्द्र प्रभू

काल

या उजाड माळावरती मी उन्हात फिरतो आहे ती फुले काल रात्रीची मी अजून शोधतो आहे तू सांजवेळी आलीस अवचीत अशी हसलीस ना कळले मजला काही की मला तशी दिसलीस तो गंध फुलांचा होता की तुझाच होता सांग पसरला सभोवती होता नव प्रेमाचा मृदगंध तारका नभी फुलताना तू कळ्या मांडल्या होत्या अन गालावर कुसूमाच्या निश्वास टाकला होता तो चंद्र साक्षीला होता की तुझाच तो फितूर सामोरा

by Narendra Prabhu (noreply@blogger.com) at January 12, 2014 08:20 AM

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

कधी कधी...

कधी कधी अभेद्य
पहाडही निराश होतात
हताश होतात
खांदे पाडून संध्याकाळी
उतरत्या उन्हात 
एकाएकी
मूक होऊन जातात
धुकट नेत्रांनी
आपल्याच लोकांनी केलेले 
आपले 
पराभव
निमूटपने पहात राहतात...!

by Sanjay Sonawani (noreply@blogger.com) at January 12, 2014 07:39 AM

अब्द शब्द

१८५ . विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १९: मोक्षमार्ग (१)


मोक्ष हा प्राप्य नाही, उत्पाद्य नाही, विकार्य नाही आणि संस्कार्यही नाही हे खरे. मग माणसाने काय करायचे? एक गोष्ट सांगतात की, एकदा एक माणूस झाडाखाली निवांत झोपला होता. ते पाहून दुस-याने त्याला उठून काही काम करायला सांगितले. तो जे काही सांगेल त्यावर पहिल्याचा 'मग त्याने काय होईल? असा प्रश्न तयारच असे. बरीच लांबण लागता लागता ' तुला उद्योग करुन, भरपूर पैसे मिळवून निवांत बसता येईल असे दुसरा माणूस म्हणाला. त्यावर मग आळशी माणूस हसून म्हणाला, 'मग आत्ता मी निवांत बसलोच आहे की! त्यासाठी एवढी सगळी दगदग करायची काय गरज?

तमस आणि सत्व हे दोन्ही गुण टोकांनी पाहिले असता एकाच प्रकारचे दिसतात. जनकासारखा कार्यरत माणूस मुक्त असेल हा विचार आपल्या सहजी पचनी पडत नाही, हा एक भाग झाला. दुसरे असे की, ही आंतरिक अवस्था नेमकी मिळवायची कशी या प्रश्नाला नेमके एक असे सार्वजनीन उत्तर नाही. त्यामुळे संभ्रम पैदा होतो. जर आम्ही स्वरुपत: मुक्तच आहोत अन प्रत्यक्षात आम्ही स्वत:ला बंधनामध्ये पाहतो तर मुक्तीचा काही ना काही मार्ग, काही ना काही प्रक्रिया असलीच पाहिजे असे आपल्याला वाटत राहते.

विवेकानंद म्हणतात, जगातील माणसांची सर्वसामान्यपणे चार गटांत विभागणी होते. ते म्हणजे बुद्धिवादी, भावनाशील, साक्षात्कारवादी आणि कर्मशील. आता या सर्वांना एकाच प्रकारचा मार्ग देवून चालणार नाही. असे करणे म्हणजे त्या माणसाचे नुकसान करणे होय. एकाच मार्गाचे अनुसरण करण्यात सर्वांचे भले नाही. ज्याच्या त्याच्या स्वभावाला अनुसरुन, त्याला साहायक ठरतील असाच मार्ग प्रत्येक व्यक्तीसाठी असला पाहिजे असा विवेकानंदांचा आग्रह आहे .

अर्थात वेगवेगळे असणारे हे सर्वच मार्ग महत्त्वाचे आहेत - पण साधन म्हणून! त्यांच्याद्वारे प्राप्त होणारे गन्तव्यस्थान एकच असल्याने या मार्गांचे आपापसात भांडण असण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या व्यक्तीला मुंबईहून दिल्लीला जायला अनेक गाडया आणि साधने आहेत. त्याने आपली सोयीची वेळ, दिवस, ऐपत आणि तिकीटाची किमत...इत्यादी पाहून गाडी ठरवावी व जावे - आपण दिल्लीला पोहोचणारच याबाबत कसलीही शंका न बाळगता! एकदा एका विशिष्ट गाडीत बसल्यावर मात्र अमूक एक स्थानक या मार्गावर आलेच नाही अशी तक्रार करत बसू नये. कारण महत्त्व मार्गावरील स्थानकांना नाही तर महत्त्व आहे मुक्कामास पोहोचण्याला!

स्वामीजी म्हणतात, धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग म्हणतो. या योगाचे चार मार्ग आहेत. १. कर्मयोग - या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्ये यांच्याद्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. २. भकितयोग - या पद्धतीनुसार सगुण ईश्वरावर प्रेम करुन आणि त्याची भक्ती करुन मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ३. राजयोग- या पद्धतीनुसार मन:संयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ४. ज्ञानयोग - या पद्धतीनुसार ज्ञानाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. त्या एकमेव स्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत.


स्वामीजींनी सांगितलेले हे चार मार्ग बरेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊ.
क्रमश: 

by aativas (noreply@blogger.com) at January 12, 2014 07:06 AM

Lakshmi Sharath

Sunday Snapshot – A morning in Angkor Wat

AngkorWat, people, Cambodia, Siem Reap

A morning at Angkor Wat

I am always a bit wary about taking photographs of people abroad without asking for their permission. However I was standing in one of the towers and looking out . These people were too far to ask for permission and I just clicked the picture.

The post Sunday Snapshot – A morning in Angkor Wat appeared first on Lakshmi Sharath.

by Lakshmi Sharath at January 12, 2014 06:55 AM

आपला सिनेमास्कोप

स्कोर्सेसीचा वुल्फ
'देअर इज नो नोबिलिटी इन पाॅवर्टी'
जाॅर्डन बेलफर्ट, द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट

मार्टीन स्कोर्सेसीने वाईट चित्रपट बनवलाच नाही, वा बनवणं शक्य नाही असं मी म्हणणार नाही, मात्र एवढं नक्की म्हणेन की त्याचा चित्रपट हा केवळ पैसा मिळवणं, या एका कारणापुरता मर्यादित कधीच नसेल. स्कोर्सेसी हा हाॅलिवुडच्या चौकटीत राहूनही त्यांच्या व्यावसायिक गणितात न अडकणारा आणि कोणाची भीडभाड न ठेवता केवळ आपल्या मनाला पटेल तेच चित्रपट करणारा दिग्दर्शक आहे. त्याचे चित्रपट हे बरेचसे व्यक्तिप्रधान असतात आणि या व्यक्ति ज्या स्थलकालाशी जोडलेल्या आहेत त्या स्थलकालापर्यंत पोचण्याचा या दिग्दर्शकाचा प्रयत्न असतो. तो स्वत: ज्या सामान्य परिस्थितीतून वर आला तिचा, त्याच्या स्वत:च्या भूतकाळातल्या व्यसनाधीनतेसारख्या गडद घटनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभावही त्याच्या चित्रपटांवर नियमितपणे दिसून येतो. त्याचा कोणताही प्रयत्न केवळ प्रेक्षकाना खूष करण्यासाठी असत नाही. कदाचित त्यामुळेच मी जेव्हा त्याच्या एखाद्या चित्रपटावर सरळ सरळ टिका झाल्याचं एेकतो तेव्हा स्वत: चित्रपट पाहीपर्यंत तिच्यावर विश्वास ठेवत नाही. भ्रष्ट स्टाॅकब्रोकर जाॅर्डन बेलफर्टच्या आत्मचरीत्रावर अाधारित ' द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट' या त्याच्या नव्या चित्रपटावरल्या टिकेलाही मी त्यामुळेच फार बधलो नाही.

चित्रपट हा जाॅर्डन बेलफर्टचा उदयास्त मांडतो. मोठा स्टाॅकब्राेकर होऊन चिकार पैसा मिळवण्याची इच्छा बाळगणारा साधारण सरळमार्गी जाॅर्डन (लिओनार्दो डिकाप्रिओ) आपल्या डाॅनी ( जोना हिल) या मित्राच्या मदतीने कसा अब्जाधीश झाला आणि आपल्या 'स्ट्रॅटन ओकमाॅन्ट' या वजनदार नावाच्या कंपनीच्या नावाखाली त्याने अनेकांना कसं लुबाडलं याची सुरस आणि चमत्कारिक कहाणी वुल्फ मधे मांडली जाते. जाॅर्डन आणि डाॅनी या जोडगोळीचे अनेक रंगतदार आणि काही अविश्वसनीय उद्योग यात आपल्याला पाहायला मिळतात मात्र चित्रकर्त्यांवर विश्वास ठेवायचा, तर अतिशयोक्त वाटणारं  हे सारं प्रत्यक्षात घडलं.

अनेक चित्रपटांचा पेच असा असतो, की मुळात ते एखाद्या गोष्टीला विरोध असल्याचा आव आणतात ( सर्वात लोकप्रिय उदाहरणं म्हणजे गुन्हेगारी आणि स्त्रीयांवरले अत्याचार या विषयांवर आधारलेले चित्रपट ) मात्र या वरवर विरोध असलेल्या गोष्टी मांडताना ते इतके रंगून जातात की प्रेक्षकांच्या मनात या गोष्टींबद्दल एक सुप्त आकर्षणच तयार करतात. अशा चित्रपटांचं यशही धोकादायक ठरतं, कारण ते याच साच्यातल्या नव्या चित्रपटांच्या निर्मितीसाठीही प्रोत्साहन देणारे ठरतात आणि प्रमाणाबाहेर आलेली अशा चित्रपटांची लाट सामाजिक विचारसरणीला बाधक ठरू शकते. ' द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट'  वरली टिका ही त्याला या प्रकारचा चित्रपट मानून करण्यात आलेली आहे. याचं कारण आहे तो उघडच त्यातला जाॅर्डनची भरभराट दाखवणारा काळ, जो अनेक बाबतीत अतिशय मनोरंजक आहे. चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेली वेगवान पटकथा, भरपूर नेत्रसूख देणारे प्रसंग ( यातले बरेचसे आपल्या सेन्साॅरच्या कचाट्यात सापडले असले, तरी काय कापलं गेलं याची आपण कल्पना सहज करु शकतो) , विनोद, प्रमुख कलाकारांचा बांधून ठेवणारा वावर, या सगळ्यातून चुकीचा संदेश जातोय की काय असा या टिकाकारांचा सूर आहे. मला मात्र तसं वाटत नाही.

स्कोर्सेसीच्या चित्रपटांना नकारात्मक नायक, अर्थात अॅन्टीहिरो काही नवीन नाहीत. किंबहुना त्याच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे नायक हे अॅन्टीहिरोच आहेत. टॅक्सी ड्रायवर, रेजिंग बुल, गुडफेलाज पासून अगदी शटर आयलन्ड पर्यंत अनेक नावं आपण घेऊ शकू. माणसं म्हणून या नायकांना कोणी सज्जन म्हणणार नाही, मात्र स्कोर्सेसी त्यांना खलनायक ठरवत नाही.तो चित्रपट त्यांच्या दृष्टीकोनातून मांडतो. त्यांचं जग कोणत्या घटकांचं बनलय हे जाणून घेण्याचा आणि ते उलगडून पाहाण्याचा प्रयत्न करतो. या व्यक्तींच्या जगण्यातला महत्वाचा पैलू त्या त्या चित्रपटाच्या शैलीचा भाग म्हणून आपल्यापर्यंत येतो. टॅक्सी ड्रायवर मधला एकटेपणा, रेजिंग बुल मधला पब्लिक इमेजचा सोस, गुडफेलाजमधली वैयक्तिक प्रगतीची हौस, शटर आयलन्ड मधली दु:स्वप्न ही त्या त्या नायकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. हे घटक त्यातल्या निवेदनातून, दृश्य प्रतिमांमधून , वातावरणनिर्मितीमधून आपल्यापर्यंत पोचतात. ते बाजूला काढून त्यांची गोष्ट सांगणं या दिग्दर्शकाला कधीच मान्य होणार नाही. त्याच तर्कशास्त्राला धरुन पाहिलं तर लक्षात येतं की वुल्फच्या कथनशैलीचा महत्वाचा घटक आहे, तो अतिरेक.

जाॅर्डनचं एकूण वागणं, त्याचा आयुष्याकडे पाहाण्याचा रोख हाच अधिकस्य अधिकम् फलम् या प्रकारचा आहे. सर्वांपेक्षा जास्त पैसा, सर्वात रंजक करमणूक, सर्वात सुंदर स्त्रीया, सर्वाधिक ताकदीचे ड्रग्ज हीच त्याची जगण्याची व्याख्या आहे. हेच त्याचं जग आहे. हे जर आपल्याला दिसलं नाही, तर आपण त्याच्यापर्यंत पोचूच शकणार नाही.

स्कोर्सेसीच्या चित्रपटातले नायक हे सद्गगुणी नसले तरी सहानुभूती मिळवून जातात यात आश्चर्य नाही कारण हे चित्रपट  त्यांच्या नजरेतून गोष्ट मांडतात. वुल्फमधे तर जाॅर्डन स्वत:च आपली गोष्ट सांगतो. कधी पार्श्वभूमीला येणार््या निवेदनातून तर कधी चौथी भिंत विसरुन थेट प्रेक्षकांशी संवाद साधत. मात्र त्याचं निवेदन हे शंभर टक्के प्रामाणिक असेल याची खात्री नसल्याचंही दिग्दर्शक एका गंमतीदार प्रसंगात दाखवून देतो ज्यात ड्रग्जच्या अंमलाखाली असलेल्या जाॅर्डनने गाडी चालवत केलेला मैलभराचा प्रवास, हा निवेदनातून आल्यानंतरही वास्तवात खूपच वेगळ्या पध्दतीने घडल्याचं आपल्याला दाखवून दिलं जातं. दृष्टीकोन, व्यक्तिगत सत्य आणि वास्तव यांच्यातला फरक हा सतत दाखवण्यात आला नाही, तरी तो आहे, असू शकतो, हा दिग्दर्शकाने आपल्याला दिलेला इशारा म्हणजेच हा प्रसंग.

तरीही एकूण चित्रपट, हा जाॅर्डनची काळी बाजू लपवण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहुना स्वत: जाॅर्डनचेही त्याच्या तसं असण्याबद्दल गैरसमज नाहीत. स्वार्थ, हाव हा त्याच्या वृत्तीचा भाग आहे आणि आपलं तसं असणं हे त्याला मान्य आहे. त्याची पत्नी जेव्हा त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल जाब विचारते, तेव्हा तो खोटेपणाने तिची समजूत काढायचा प्रयत्न करत नाही, तर असं असं आहे, हे मान्य करुन टाकतो. एफ बी आय अधिकार््याने त्याच्यावर लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यावरही तो हा आरोप अमान्य करत नाही, मात्र तो अप्रत्यक्ष असल्याने सिध्द होणार नाही असं हसत हसत सांगतो. या प्रसंगांमधे दिग्दर्शक वा नट , या माणसाची चूक नव्हती असं कुठेेही दाखवत नाहीत, किंबहुना त्याचं वागणं जस्टीफाय करण्याचा, त्याला कारणं देण्याचा कुठेही प्रयत्न करत नाहीत. तो असाच आहे हे प्रांजळपणे मान्य करतात.

अर्थात, जशी खर््या गोष्टींमधे संपूर्ण पांढरी पात्र नसतात, तशी संपूर्ण काळीही नसतात. जाॅर्डनची डाॅनीबरोबरची मैत्री, वेळोवेळी त्याचं या मैत्रीला जागणं, आपल्या कंपनीने वाईट मार्ग अवलंबले तरी तिच्यामार्फत अनेकांना दिल्या जाणार््या संधीचं कौतुक अशा गोष्टीही त्याच्या व्यक्तिमत्वाचाच भाग आहेत. सर्वांना श्रीमंत होण्याचा हक्क हवा अशी त्याची पक्की धारणा आहे आणि त्याचं जगण्याचं तत्वज्ञान हे या धारणेतून तयार झालय. या हक्काच्या आड येणारी गोष्ट त्याला मान्य नाही, मग ती कायद्यासारखी मूलभूत सामाजिक गरज का असेना. स्कोर्सेसी या तत्वज्ञानाला रंगसफेदी करत नाही , उलट त्यामधून ' अमेरिकन ड्रीम' च्या आदर्शवादी संकल्पनेवर टिका करतो.

मीन स्ट्रीट्स, गुडफेलाज, कसिनो अशा चित्रपटांमधून स्कोर्सेसीने अमेरिकेतल्या गुन्हेगारी जगाकडे वेगळ्या पध्दतीने पाहिलं होतं. नाट्यपूर्ण चढउतारांपेक्षा हे कल्चर कसं आज समाजजीवनाचा एक भाग बनलय अन गुन्हेगारी हा जणू एक व्यवसाय आहे अशा पध्दतीने या चित्रपटांची रचना होती. द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट हा त्या रचनेशी समांतर रचनेत प्रतिष्टीत स्टाॅकब्रोकरच्या कारवाया दाखवतो आणि अमेरिकन समाजाच्या एका पातळीवर पैसा, सत्ता आणि गुन्हेगारी यांचं एक अपरिहार्य मिश्रण झाल्याची कल्पना पुढे करतो.  समानता आणि त्यातून प्रत्येकाला मिळणारा सुखाने राहाण्याचा मूलभूत हक्क हा 'अमेरिकन ड्रीम' च्या मुळाशी आहे. मात्र आजच्या समाजात या हक्काचा होणारा विपर्यास या दिग्दर्शकाने वेळोवेळी प्रखरपणे दाखवला आहे.  ' द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट' हा या विचारधारेचाच एक भाग म्हणता येईल.
- ganesh matkari
 (maharashtra timesmadhun)

by सिनेमा पॅरेडेसो (noreply@blogger.com) at January 12, 2014 06:37 AM

स्कोर्सेसीचा वुल्फ


'देअर इज नो नोबिलिटी इन पाॅवर्टी'
जाॅर्डन बेलफर्ट, द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट

मार्टीन स्कोर्सेसीने वाईट चित्रपट बनवलाच नाही, वा बनवणं शक्य नाही असं मी म्हणणार नाही, मात्र एवढं नक्की म्हणेन की त्याचा चित्रपट हा केवळ पैसा मिळवणं, या एका कारणापुरता मर्यादित कधीच नसेल. स्कोर्सेसी हा हाॅलिवुडच्या चौकटीत राहूनही त्यांच्या व्यावसायिक गणितात न अडकणारा आणि ...

पुढे वाचा

by सिनेमा पॅरेडेसो at January 12, 2014 06:37 AM

काल

या उजाड माळावरती

मी उन्हात फिरतो आहे

ती फुले काल रात्रीची

मी अजून शोधतो आहे

तू सांजवेळी आलीस

अवचीत कशी हसलीस

ना कळले मजला काही

की मला तशी दिसलीस

तो गंध फुलांचा होता

की तुझाच ...

पुढे वाचा

by Narendra Prabhu at January 12, 2014 05:30 AM

सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती

वैद्यकीय भोंदूगिरी

आरोग्यक्षेत्रात इतर क्षेत्रांप्रमाणेच माहिती अधिकार येणे अत्यावश्यक बनले आहे. परदेशात डॉक्टरवर रोगाचे निदान, त्यावर दिलेली ऒषधे,  त्याचे संभाव्य निष्ट अनिष्ट परिणाम याविषयी रोग्यास पूर्ण माहिती ...

पुढे वाचा

by svranade Dnyandeep at January 12, 2014 02:09 AM

January 11, 2014

संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]

११८६. धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः |

धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ||

अर्थ

[उत्कृष्ट अशा] धर्माच स्वरूप या दहा गोष्टीत येत - दृढनिश्चय; क्षमा करण; मनावर ताबा; चोरी न करणं; शुद्धता; इंद्रीयावर ताबा; सदसद्विवेक; शिक्षण; सत्य आणि न रागावणं;

by मिलिंद दिवेकर (noreply@blogger.com) at January 11, 2014 03:09 PM

जाणता अजाणता - भाग ४

_ident = "marblogwidget_1_5572"; _img = "marblogimg5572"; refTracker(_ident, _img);
तन्वीने आणलेले पोहे नेहमीइतके किंबहुना त्याहून अधिकच चविष्ट होते. पण शंतनुचे त्याकडे लक्षच नव्हते. तिच्या शांतपणात काहीसा वेगळेपणा आहे असेच त्याला राहून राहून वाटत होते. खुशीत असल्यावर नेहमी त्याच्या अवतीभोवती घुटमळणारी तन्वी आज त्याला टाळत होती असाच भास त्याला होत होता. त्यावर तो तसाच बराच वेळ विचार करीत बसला ...

पुढे वाचा

by New English School Vasai 1988 Batch at January 11, 2014 02:44 PM

मौन

प्रत्येक मनुष्यमात्राचं अंतिम उद्दिष्ट असतं आनंद आणि शांती. चिरस्थायी अशी शांती! सत्ता, पैसा, भौतिक सुखं हव्यास वाढवतात. परिणामी दु:ख वाढवतात. त्यांच्या प्राप्तीने मन शांत होत नाही. बेचैनी कमी होत नाही. हवीशी वाटणारी सारी भौतिक सुखे मिळूनही आपण शांत नाही, आनंदी नाही. हे कुणाला लवकर कळतं. कुणाला उशिरा कळतं. ते कळलं की सत्याच्या शोधासाठी साधकाची ...

पुढे वाचा

by Narendra Prabhu at January 11, 2014 11:24 AM

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

"माझे मन तुझे झाले"

नमस्कार,
हा विषय लग्नाळु मुलगा आणि मुलगी या॑च्या बद्द्ल आहे. (तशी मी लिखाणात सराईत नाही, पण जे मनात आहे ते मा॑ड्ण्याचा हा प्रयत्न आहे. तरी समस्त मिपाकर आणि मिपा चे टिकाकर यातिल भावना समजुन घेतिल, बाकी टिका॑सहित मिपाकरा॑च्या हाति.) वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्ति॑नी "लग्न" या विषयी योग्य ते मार्गदर्शन करावे.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

by पल्लवि कुलकर्नि at January 11, 2014 11:09 AM

असे व्यक्तिमत्व होणे नाही..

दाजीकाका गाडगीळ...

व्यायामानंतर ज्वारीची भाकरी आणि दूध यांची न्याहरी करुन नेहमी शाकाहारी भोजन घेणारे दाजीकाका..नेहमी सांगत आरोग्य चांगले रहायचे असेल तर स्वतःच्या शरीरीची , मनाची अधिक चांगल्या पध्तीने जोपासना करायला हवी..माझ्या माहितीप्रमाणे व्यायाम आणि योगासने नियमीत करून आपले शरीर त्यांनी तंदुरुस्त ठेवले. व्यावसायाची धुरा मुलगा, मग नातू ...

पुढे वाचा

by Subhash Inamdar at January 11, 2014 08:00 AM

ती आणि तिचा बाप !

अमेरिकेतीतल भारतीय दूतावासातील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेने हकालपट्टी केलेली आहे. त्याला उत्तर म्हणून भारतानेही त्याच दर्जाच्या एका भारतीय दूतावासातील अमेरिकी अधिकार्याला 48 तासात देश सोडण्यास सांगितले आहे. गेला महिनाभर सुरू असलेले दोन देशातील राजनैतिक युद्ध आता थांबेल की यात नव्या युद्धाची बीजे असतील हे येणारा काळच सांगेल ! खोब्रागडेंच्या नजरेतुन ...

पुढे वाचा

by असा हा एक(ची)नाथ ! at January 11, 2014 06:25 AM

Chakali

सध्याची शिक्षणपद्धती आणि रोजगाराची समस्या

आपण नेहमी म्हणतो की  आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी झाले आहेत व त्यांचे लक्ष विषयांचे ज्ञान मिळविण्याऎवजी  परिक्षेत जास्त मार्क कसे मिळतील याकडे असते. त्यामुळेच क्रमिक पुस्तके व पुरवणी ...

पुढे वाचा

by svranade Dnyandeep at January 11, 2014 04:02 AM

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

"माझं आभाळ": सर्वांनी वाचावे असे पुस्तक!


सचीन परब या मनमोकळ्या शोधक तरुणाशी माझी प्रत्यक्ष ओळख नंतर झाली....पहिली ओळख त्यांच्या ब्लोगशी. "माझं आभाळ" हा ब्लोग खरंच एका संवेदनशील माणसाच्या अविरत शोधाशी, चिंतनशीलतेशी ओळख करुन देणारा व चिंतन करायला भाग पाडणारा. दोनेक वर्षांपुर्वीची ही गोष्ट असेल तेंव्हा माझा त्यांच्या ब्लोगशी परिचय झाला. काही लेख वाचले आणि त्यांच्या ब्लोगच्या प्रेमातच पदलो. सारे लेख आठवडाभरात वाचुन काढले. वाचकांच्या उत्स्फुर्त वाहवाहीच्या पण चिकित्सक प्रतिक्रियाही वाचल्या. मी त्यांच्या नवीन लेखनासाठी त्यांच्या ब्लोगचा पाठपुरावा करत असे. हा माणूस तसा आळशी असावा हा मी तर्क बांधला कारण बरेच दिवस काहीच नवे येत नसे. पण लिहिण्यासाठी उचंबळून येत नाही तोवर हा माणुस काही लिहित नाही हे लक्षात आले आणि मग मी गुमान नव्या लेखाच्या नोटिफिकेशनची मेलवर वाट पाहू लागलो.

छापील लेखन आणि ब्लोग ही दोन विभिन्न तंत्रे. ब्लोग लिहिणारे असंख्य झालेत ते त्यातील तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे. प्रसारही पटकन होतो असे वाटते यामुळे. पण ते वास्तव नाही. नियमित वाचले जाणारे ब्लोग मराठीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. कारण साधं आहे. फुकट वाचायला मिळतं म्हणून कोणताही ब्लोग वाचावा असे वाचक करत नाही. तो लेखकाची योग्यता एखाद-दुसरा ब्लोग वाचुन ठरवून लेखकाची पत ठरवून टाकतो. सचिन परबांचा ब्लोग मोजक्या नियमीत वाचल्या जाणा-या ब्लोगपैकी एक. त्यातही वैशिष्ट्यपूर्ण.

त्यांच्या सर्व लेखांत विषय वेगळे असले, प्रथमदर्शनी प्रासंगिक वाटले तरी एक आंतरिक सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे निखळ मनाने केलेली समाज-समिक्षा. ती अवघड आहे. पुर्वग्रहविरहित लिहिणे आणि प्रश्नाच्या मुळाशी नेणे सहजी होणारे काम नाही. सचिन परबांना हे जमते कारण त्यांचा स्वभावच मुळी नितळ स्वच्छ पाण्याप्रमाणे खरे खरे प्रतिबिंब दाखवणारा आहे. या माणसाला साधे चेह-यावरचे भाव लपवता येत नाही तो लेखनात काय लपवालपवी करू शकणार? हे माझे त्यांच्याबद्दल मत बनले ते पहिल्या भेटीतच! नंतर आम्ही अपरिहार्यपणे मित्र झालो ते झालोच!

ब्लोगचे पुस्तकात रुपांतर होणे हा दुर्मीळ योग. मराठीत कदाचित पहिलाच! मला हे पुस्तक प्रकाशित करावे वाटले ते सचीन परब माझे निकटतम मित्र आहेत म्हणून नव्हे. त्यांच्या लेखनात एक चिरंतनता आहे. माणसाला स्वत:कडे डोळसपणे पहायला लावायची एक विलक्षण शक्ती आहे. नेटवर त्यांचे लाखो वाचक आहेतच पण जो अवाढव्य वाचकवर्ग अजून नेटसाक्षर नाही. अथवा असला तरी छापील वाचल्याखेरीज जीवाचे समाधान होत नाही अशा वाचकांपर्यंत ही विचारसाधना पोहोचावी म्हणून मी हे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले.

स्वतंत्र विचारांचे एक मूल्य असते आणि कोणताही समाज नवनव्या विचार-संकल्पनांशी परिचित होत नाही, मोकळ्या आभाळासारखं स्वच्छ व निरामय बनत चिंतन-प्रगल्भ होत नाही तोवर आपल्या समाज बौद्धिक उंचीचा आलेखही गाठू शकत नाही. वाचकांपर्यंत हे मनमोकळं पण चिंतन-प्रगल्भ लेखन पोहोचले पाहिजे या जाणीवेने मी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. एका आधुनिक माध्यमातून झालेले लेखन दुस-या पारंपारिक माध्यमात प्रकाशित करणे यात एक मौजही आहे. भविष्यात सर्वच माध्यमांची एक मजेशीर पण उपयुक्त अशी सरमिसळ होत जाईल याचीही एक नांदी आहे.

वाचक या पुस्तकाला पुष्पच्या अन्य मौलिक प्रकाशनांप्रमाणे उत्तम प्रतिसाद देतील याचा विश्वास आहे. सचीन परबांनी आळस झटकुन जरा लेखनाचा वेगही वाढवावा असा त्यांना माझा "प्रकाशक" आणि एक वाचक म्हणून सल्लाही आहे!

अमर हबीब सरांनी या पुस्तकाला अल्पावधीत अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहून देवून या पुस्तकाच्या महत्तेला उलगडून दाखवले याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे.

-संजय सोनवणी
पुष्प प्रकाशन

पुस्तकाचे वितरकः भारत बुक हाऊस, पुणे फोन 020 32548032/3 मोबाईल 9850784246 

by Sanjay Sonawani (noreply@blogger.com) at January 11, 2014 03:25 AM

सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती

स्मृति

अनामिका ... (९)


मैत्रिणीच्या मावसबहिणीचे लग्न थाटामाटात पार पडते. संध्याकाळच्या रिसेप्शन पार्टीला सगळेजण तयार होतात. संजली पण एक छान साडी नेसून तयार होते. तिच्या हातात मोबाईल असतोच. अमितचा फोन येणार असतो. उशीराने विमानाचे उड्डाण असल्याने विमानतळावर गेल्यावर तो संजलीला फोन करणार अस्तो. अमितचा फोन कधी येईल या विचारात ती असते. तितक्यात फोन वाजतो. लगबगीने संजली नवऱ्या मुलीच्या खोलीत शिरते. "बोल अमित" अमित तिला सांगतो मी आता विमानतळावर जायला निघतोय तिथे पोहोचलो की साधारण तासा दोन तासाने तुला फोन करीन म्हणजे ११ वाजता. तू झोपणार नाहीस ना ! संजली म्हणते नाहीरे , मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे. आम्हाला सुद्धा घरी पोहोचतेपर्यंत उशीर होईलच. पण आता तुला नाही का बोलता येणार? कारण की आता इथे माझ्या आजुबाजूला कोणीच नाहीये. नंतर घरी गेल्यावर मात्र माझ्या मैत्रिणी असतील. पण तरी बघते मी कसे काय मॅनेज करता येईल ते !
रात्री उशीरापर्यंत मंडळी घरी परततात. सर्वजण खूप दमलेले असतात. घरात पसारा असतो. संजली व तिच्या मैत्रिणी खोलीत येतात कुणालाही बोलायची ताकद नसते. उद्या सकाळी पुण्याला परत जायला लवकर निघायचे असते. संजलीला झोप येत असूनही तिला जागेच रहायचे असते कारण की अमितचा फोन येणार असतो. संजली मात्र या सगळ्या गर्दीत मला अमितशी कसे काय बोलता येणार आहे कोण जाणे, अशा विचारात असते. कार्यालयात अमितचा फोन आला तेव्हाच का नाही बोलला आपल्याशी? काय करावे आता? अशा विचारातच ती आडवी होते. हातात मोबाईल असतोच. दारावरची बेल वाजते. कोणीतरी निरोप घेऊन आलेले असते की वरच्या मजल्यावरच्या पाहुण्यांमध्ये एका आजींना त्यांच्यासोबत झोपायची गरज आहे. त्यांना जरा बरे वाटत नाही तर कुणी तयार आहे का? संजली लगेचच होकार देते. दुसऱ्या मजल्यावर त्या आजीबाई एकट्याच एका रूममध्ये झोपलेल्या असतात. त्या म्हणतात माझा सून एका नातेवाईकांकडे गेली आहे ती उद्या येईल. आणि मला थोडे बरे वाटत नाही म्हणून तुम्हाला बोलावले. संजली त्या आजींना सांगते काही काळजी करू नका. मी आज तुमच्या सोबतीला आहे. काही लागले तर सांगा. फक्त मला एक फोन येणार आहे तर चालेल ना? आजी म्हणतात अगं हो, न चालायला काय झाले? मी तर आता औषध घेऊन लगेच झोपेन. कदाचित मला झोप लागेल. आज सबंध दिवस लग्नात दगदग झाली इतकेच. त्यामुळे थोडे ताप आल्यासारखे वाटत आहे.


त्यांच्या समोर असलेल्या कॉटवर संजली आडवी होते. रिंगटोन खूप कमी करते. संजलीला काही केल्या झोप येत नसते. केव्हा करणार हा फोन? असे म्हणत पाणी प्यायला उठते आणि आजींना झोप लागली आहे का नाही ते बघते. तर त्या शांत झोपलेल्या असतात. परत येऊन कॉटवर पडते. तिला खरे तर खूप झोप येत असते पण झोपता तर येत नसते अशी अगदी वाईट अवस्था होऊन जाते. अमितच्या फोनची वाट बघून बघून तिला कंटाळा येतो तेवढ्यात फोन वाजतो. तो अनिलचा असतो. तो विचारतो काय गं उद्या निघताय तुम्ही सर्व? मला उद्या एक महत्त्वाची मिटिंग आहे त्यामुळे मी दिवसभर नाहीये आणि आईला पण जरा बरे वाटत नाही. तर लवकर निघून या. म्हणजे तुला पण घरी आल्यावर जरा विश्रांती मिळेल. संजली जांभया देत देत अनिलला उत्तरे देत असते. आणि म्हणते चल बाय. मी झोपते आता. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून फोन बंद करते. आणि लगेचच अमितचा फोन येतो. अमितचा फोन आल्यावर मात्र तिची झोप उडते आणि उत्साहात बोलायला लागते. त्याला ऐकू जाईल अशा आवाजात पण थोडे हळू बोलत राहते. त्याचे बोलणे थांबूच नये असे तिला वाटत असते. मागच्या काही आठवणी निघतात. अमित तिच्या आईवडिलांची पण चौकशी करतो. बऱ्याच वेळ गप्पा मारल्यावर अमित म्हणतो चल आता मी फोन ठेवतो. विमानात बसायला सुरवात झाली आहे. मी तुला पोहोचल्यावर फोन करेन पण वाट पाहू नकोस. नंतर कधीतरी वेळ मिळेल तसा तुला फोन करीन आणि हो पुढच्या वर्षी आल्यावर अनिलला नक्की भेटेन मी. अगं तो माझा चांगला मित्र आहे पण पूर्वी काही घटना घडल्या आणि मी त्या घरात येईनासा झालो, ते का हे मी तुला सांगितलेच आहे, त्यामुळे त्याचे माझ्याशी बोलणे झालेच नाही.


परत एकदा आजींकडे बघते तर त्या शांत झोपलेल्या असतात. मनात म्हणते बरे झाले त्या झोपल्यात त्यामुळे मला अमितशी छान बोलता आले. तिला बराच वेळ झोप येत नाही. पहाटे पहाटे तिला थोडी झोप लागते.   सकाळी तिच्या मैत्रिणी तयार होऊन तिच्या खोलीची बेल वाजवतात तेव्हा संजली दचकून जागी होते. दार उघडताच ' अगं संजली तुला किती फोन केले. तु तुझा फोन बंद करून का ठेवलास? चल आवर लवकर तुझे. आपल्याला निघायचे आहे. संजली भराभर आवरून तयार होते. लग्नघरी सर्वांचा निरोप घेऊन संजली व तिच्या मैत्रिणी पुण्याला जायला निघतात. वाटेत संजली थोडी थोडी डुलकी घेत असते. तिला खूप दमल्यासारखे झालेले असते. ती तिच्या घरी येते तेव्हा आत्याबाई घरात असतात. अनिल मिटिंगला आणि मुलगा शाळेत गेलेला असतो. आत्याबाई विचारतात कसे झाले लग्न? खूप मजा केलीत का तुम्ही मैत्रिणींनी? स्वयंपाक तयार आहे. आपण दोघी जेवू. "हो आत्याबाई. खूप मजा आली लग्न छानच झाले. प्लिज आत्याबाई. तुम्ही बसा जेवायला. मी वाढते तुमहला. मला अजिबात भूक नाहीये. मध्ये वाटेत खाणे झाले आहे. मी वर जाते. आत्याबाईना जेवायला वाढून संजली वरच्य मजल्यावरच्या तिच्या खोलीत निघून जाते.प्रवासाचा शीण जाण्याकरता ती डोक्यावरून अंघोळ करते. ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळते व त्याचा अंबाडा घालते. एक कॉटनची हलकी साडी नेसून झोपते. झोपताना ती आठवणीने दार लावते. तिला आता कोणीही तिच्या खोलीत यायला नको असते. रात्रभर झालेले जागरण व दगदग यामुळे तिला गाढ झोप लागते. झोपेतून उठते तर अनिल आलेला असतो. तिल म्हणतो अगं किती गाढ झोपली होतीस. खूप दगदग झाली का?


नाहीरे, खूप मजा आली. थोडी कालच्या जागरणाने आणि लवकर उठून लगेचच प्रवासाला निघाल्याने थोडे दमायला झाले आहे इतकेच. ती खाली जाते आणि स्वयंपाकाचे बघते. थोड्यावेळाने सर्वजण जेवायला बसतात. जेवताना तिने व तिच्या मैत्रिणींनी कसे शॉपिंग केले, काय काय मजा केली, लग्न कसे थाटामाटात झाले. याचे सविस्तर वर्णन सांगते. अनिलला ते ऐकून बरे वाटते पण एकीकडे त्याच्या मनात प्रश्नचिन्हही उभे राहते की संजली यापूर्वी उत्साहात असायची पण
इतकी उत्साही कधी नाही पाहिली. काय कारण असावे बरे??

क्रमशः ...

by rohinivinayak (noreply@blogger.com) at January 11, 2014 02:31 AM

रागाचे कारण

मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : राजाराम मोहनरॉय....

पुढे वाचा

by vaghesh at January 11, 2014 01:38 AM

January 10, 2014

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

नाईट-ओव्हर!!!

सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

by वडापाव at January 10, 2014 07:25 PM

लिझ्झी.... जगातील सर्वात सुंदर व्यक्ती

कोणीतरी सहज म्हणून यू ट्यूब वरची काही एक लिंक शेअर करते. केवळ ती शेअर करणारावर विश्वास असतो म्हणून मी ती लिंक उघडली. आणि आश्चर्याचा धक्का बसवा असा अनुभव येतो.
लिझ्झी - एक आगळी वेगळीच व्यक्ती. स्वतःला पूर्णपणे जाणून असलेली. स्वतःच्या कमतरतेवर मात करत ती बरेच काही सांगते. हा अर्थातवाचण्याचा नव्हे तर अनुभवन्याचा भाग आहे.
जीला जगातली सर्वात कुरूप व्यक्ती आहेस डोक्यात गोळी मारून आत्महत्या कर असे सल्ले मिळत होते.
ती स्वतःची कहाणी सांगते ते देखील कोणतीच सहानुभूती मिळवायला नव्हे तर तुम्हाला जगायचे बळ द्यायला.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

by विजुभाऊ at January 10, 2014 06:38 PM

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

शेतकरी फार शहाणा होता!

एके काळी भारतीय शेतकरी फार शहाणा होता. आपल्याला पुढील मोसमात लागणारे बियाने तोच आलेल्या पीकातून जतन करायचा. प्रत्येक प्रदेशाचे आपापले नैसर्गिक आणि भौगोलिक असे मृत्तिका वैविध्य असते याची जाण त्याला होती. या वैविध्यामुळे येणारे पीक हे भौगोलिक "स्वत्व" घेवून येते हेही त्याला माहित होते. मृत्तिकेचे वैविध्य हे मातीतील विशिष्ट खनिजवितरणाने येते हे भले त्याला माहित नसेल. पण बीजेही मातीची आणि उत्पादनही मातीचे यामुळे पीक हे फक्त "पीक" रहात नसून उपजत वेगळा स्वादिष्टपना हे त्या पीकांचे अंगभूत असे वैशिष्ट्य होते. कृष्णाकाठची वांगी आणि खानदेशी भरिताची वांगी हे पीकवैविध्य उगाच आले नव्हते. मेहरुनची बोरे खाणे हा दुर्मिळ असला तरी वेगळा खाद्यानंद होता. लवंगी मिरची कोल्हापुरची म्हनण्यात जसा आनंद होता तसेच खानदेशी मिरच्यांची चुरचुरी अनुभवण्यात वेगळा आनंद होता. गावरान ज्वारी/बाजरी/नाचणी ते तंभाटे यात वेगळाच स्वामित्वाचा आविर्भाव होता. तेही या शेतातील चांगली कि त्या शेतातील चांगली यावरचा "गावरान" वाद वेगळाच!

एकाच जातीची बोर असली तरी या बांधावरील बोरीची बोरे गोड आणि दुसर्या बांधावरील आंबट...हा प्रकार आधी कळायचा नाही. पण खनीज वितरणातील स्थानिक असमतोल हे त्यामागील कारण हे आता कळते. एका गांवातील माणसे अशी आणि शेजारच्या गांवातील मानसे तशी असे का? या प्रश्नाचे उत्तर आता कळतेय...

पण आता हा भेद संपलाय. कृत्रीम खनिजे पीकांच्या उरावर घालत अनैसर्गिक पीके आम्ही कोठेही घेऊ शकतो! रासायनिक खते असल्याने खनिजांबरोबरच रसायनेही आवडीने गिळतो. पण ती चव कोठे आहे? ते पीकाचे "स्वत्व" कोठे आहे?

अन्नक्रांती करु पाहना-या भारताने नेहरुंच्या काळात त्याचा आरंभ केला खरा...अन्न भरमसाठ वाढले...इतके कि ते गोदामांत सडू लागले...

पण "अन्न" गेले ते गेलेच!

आता त्याची दारु बनवा असे आमचे कृषिमंत्रीच सांगतात. ही वेगळी क्रांती आहे हे मान्य केलेच पाहिजे....

पण आम्ही ज्या अन्नाविषयी खरी क्रांति करायला हवी होती ती केली नाही व निकस खाद्याचे "आधुनिक" प्रवक्ते बनत गेलो याला नेमके कोण जबाबदार यावर आम्हाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे!

by Sanjay Sonawani (noreply@blogger.com) at January 10, 2014 01:23 PM

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

गविकाकाचा सल्ला.

लेखनविषय:: 

पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.

by मन at January 10, 2014 08:56 AM

अपेक्षा

नमस्कार

माझा मिपा वर हा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न ..

काय लिहावे असा विचार करत असताना वृद्धाश्रम वरील शतशब्द कथा वाचली आणि खालील कविता - संग्रही असलेली - आठवली ,कविता खूप जुनी आहे, मी लिहिलेली नाहीय - पण भावना पोहचवण्या साठी अश्या गोष्टींची गरज नसते..
स्वतःचे लिखाण नसेल तर ते मीपा वर टंकता येते कि नाही हे माहित नाही, हि कविता या आधी मिपा वर पूर्व-प्रकाशित झाली आहे कि नाही ते पण माहित नाही. जर अशी परवानगी नसेल किंवा पूर्व प्रकाशित असेल तर आधीच क्षमस्व.

!! अपेक्षा !!

लेखनविषय:: 
काव्यरस: 

by मि मिपाचा मित्रच at January 10, 2014 07:38 AM

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली.

जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!!

"एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

by आयुर्हित at January 10, 2014 06:08 AM

Chakali

Lakshmi Sharath

At the Buddhist monastery in Udayagiri, Orissa

I was in Orissa last week and I visited the Buddhist triangle – Ratnagiri, Udayagiri and Lalitgiri which is about 100 kms from Bhubaneshwar. There were monasteries, stupas and many monuments excavated here and most of them were dated between 7th – 12th centuries. Some of these sites also had breathless landscapes like these in Udayagiri.

Udayagiri Orissa, Buddhist traingle Orissa, excavated monastery

Excavated monastery at Udayagiri

Udayagiri Buddhist triangle Orissa

Another site at Udayagiri

To see more gorgeous skies around the world, visit Skywatch this Friday.

The post At the Buddhist monastery in Udayagiri, Orissa appeared first on Lakshmi Sharath.

by Lakshmi Sharath at January 10, 2014 04:00 AM

कृष्ण उवाच

फोन बंद करून त्यांच्याशी बोला.

“आईवडील,आपल्या मुलांशी संवाद ठेवण्यापेक्षा,फोनवर बोलत रहायला जास्त पसंत करतात.”

अलीकडे मी माझ्या सगळ्यात धाकट्या नातीला घेऊन तिच्या शाळेत तिला पोहचवीण्यासाठी तिच्या बरोबर चालत जात होतो.शाळेच्या मैदानात बर्‍याच स्कूलबसीस येऊन त्यातून मुलं आणि त्यांचे पालक उतरताना दिसत होते.मालती तिच्या नातीला बसमधून उतरवून शाळेच्या दिशेने चालली होती.मला पाहिल्यावर माझ्याशी बोलायला ती थांबली.दोन्ही मुलींना शाळेत सोडून मग आम्ही चालत चालत घरच्या वाटेला लागलो होतो.एक विषय म्हणून मालती मला स्कूलबसमधला आपला अनुभव सांगत होती.
मला म्हणाली,
“सर्वच माझ्याशी सहमत होतील की,मुलांची जोपासना हे एक मोठं कठीण काम आहे. ती एक मोठी जबाबदारीच आहे असं म्हणायला हरकत नाह्यी.हे काम म्हणजे एक प्रकारचा थकवा आणणारं काम आहे.कधीही न संपणारं आणि असंतोषजनक काम आहे असं म्हणायला हरकत नाही.असं असूनसुद्धा मी अजून एकाही पालकाला भेटलेली नाही की,हे काम काही एव्हडं उचित नाही असं म्हणायला कुणी तयार होईल.

 तरीपण ज्यावेळी मी माझ्या नातीच्या स्कूलबसमधून तिच्या शाळेत जायला म्हणून जाते त्यावेळी पहाते, असे किती असे आईबाप आपल्या मुलांबरोबर बातचीतही करीत नसावेत. जास्तकरून त्यांच्या अगदी लहान मुलांशी.दोन ते पाच वर्षांची मुलं,जी सहजपणे बोलू शकतात अशी.पालक,एकतर बाहेर बघत असावेत किंवा आपल्या फोनवर बोलत असावेत.

त्यांची मुलं अगदी कसून आपल्या पालकांना संवादात व्यस्त ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. बरीच अशी मुलं खिडकीतून बाहेर बघत असावीत किंवा बसमधे बरोबर असलेल्या आपल्या मित्र-मैत्रीणीना न्याहळत असावीत.ती मुलं उत्सुक,चौकस किंवा प्रेरित झालेली असावीत.आपला अनुभव आपल्या पालकांना वाटावा असं त्यांना वाटत असावं,संबंध स्थापित करावा,दूवा ठेवावा असं वाटत असावं.परंतु,बरेच वेळा, ही अमुल्य संधी त्यांना गमवावी लागत असावी.

“ममी, ते घर बघ,बाबा, मला तहान लागली आहे,ममी,तो माणूस असा का चालत आहे?”
 अशा तर्‍हेचे संवाद बसमधे मी अलीकडेच ऐकले आहेत.पालकांबरोबर काही तरी सुसंवाद ठेवावा असं त्या मुलांना वाटत असावं.पण प्रत्येक बाबतीत फोनवर संवाद साधण्यात पालक व्यस्त दिसले.काहीतर मुलांशी वैतागलेले दिसले.
 
मी मालतील विचारलं,
“मग,मुलांची प्रतिक्रिया काय?”

“एक तर ती परत परत विचारत होती,आणि त्यांना काहीतरी समज दिली जात होती. किंवा ती मुलंच गप्प होत होती.मनात म्हणत असावीत आपल्याकडून काहीतरी चूक झाली असावी.त्यांच्या इवल्याशा चेहर्‍यावर,अस्विकृतिची नोंद झालेली दिसली,माघारी घेतल्याची नोंद झाली आहे असं त्यांच्या चेहर्‍यावर दिसलं आणि माझं डोकं सुन्नं झालं.”
मालती मला आवर्जून सांगत होती.

“हे सगळं सहजगत्या  होत असल्याचं त्यांना भासत असावं.मोठ्यांशी आपला अनुभव वाटावा ह्या मनस्थितीत ते असावेत.”
मी मालतील म्हणालो.

“खरंच,मुलांची जोपसाना कष्टप्राय आहे.पण त्या मुलांच्या भविष्यावर प्रभाव करण्याचं सामर्थ्य पालकांच्याच हातात असतं.
ह्या विषयावर संशोधन अगदी ठामपणे सांगतं की,ज्या मुलांशी संवाद साधला जातो आणि ज्यांच्या कानावरून बरेच असे शब्द आपटून जातात,विशेषकरून सकारात्मक अर्थाचे शब्द,अशी मुलं शाळेत चांगली प्रगति करताना आढळली आहेत.आणि ह्याचाच अर्थ अशी मुलं आयुष्यातसुद्धा चांगलं यश मिळवतात.”
मालतीने आपलं स्पष्ट मत दिलं.

मी मालतील सुचवलं,
“हे तुझं ऐकून मला असं वाटतं,की पालकानी आपल्या मुलांशी खूप बोलावं,त्याना घेऊन एखादं पुस्तक वाचावं.मुलांच्या स्कूलबसमधे,पालकांना आठवण व्हावी म्हणून
 ”प्रवासात मुलांशी भरपूर बोलत रहा”
अशा अर्थाच्या पाट्या लावाल्यात.आपले फोन बाजूला ठेवून,मुलांना खास बक्षीस म्हणून नव्या वर्षी संवादाचं बक्षीस द्यावं.”

मालतील ही माझी कल्पना आवडलेली मला दिसली.
मला म्हणाली,
“मी शाळेच्या मुख्याधपांची परवानगी घेऊन,माझ्या खर्चाने तुम्ही म्हणता तशा पाट्या आमच्या शाळेच्या ह्या बससीसमधे लावून घेण्याचा प्रयत्न करीन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
 


by shrikrishnasamant at January 10, 2014 03:27 AM

सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती

January 09, 2014

आनंदघन

बाबांचे अनर्थयोगशास्त्र

दहा वर्षांपूर्वी आस्था नावाच्या चॅनेलवर एक कार्यक्रम सुरू झाला आणि अल्पावधीत त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्या कार्यक्रमात योगासने आणि प्राणायाम वगैरे दाखवत असत. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम मी ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या काळापासून अधून मधून पाहिले होते. त्यातले काही सुमार तर काही उत्तम असत पण "ज्यांना अमके अमके व्याधीविकार आहेत किंवा ज्यांचे वय इतक्याहून जास्त आहेत अशा लोकांनी यातली आसने करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा." असा इशारा अखेरीस दिला असल्यामुळे मला त्यातले काही करून पाहण्याचे धाडस होत नसे. पण आस्थावरल्या या कार्यक्रमात अशी भीती घातली जात नव्हती. माझे काही सहकारी आणि नातेवाईकसुद्धा तो कार्यक्रम पाहून त्याचे चाहते झाले. आमच्या घरी रहायला आलेल्या एका पाहुण्याने भल्या पहाटे उठून टीव्हीवरला तो कार्यक्रम सुरू केला त्या वेळेस आस्था या चॅनेलवरचा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला आणि बाबा रामदेव हे नावही मी पहिल्यांदा या कार्यक्रमामुळेच ऐकले.

साधू सत्पुरुषाचा वेश धारण केलेले बाबा ज्या प्रकारची कॉम्प्लेक्स आसने करून दाखवत होते ते कौतुक करण्यासारखे होते. विशेषतः पोटातल्या निरनिराळ्या स्नायूंना ओढून ताणून किंवा फुगवून ते जी काय करामत दाखवत होते ते पाहून पोटात गोळा उठत असे. आपल्या पोटात इतके वेगवेगळे स्नायू आहेत तरी की नाही याचीच मला शंका वाटायला लागली होती कारण तिथे जे कोणते स्नायू होते ते चरबीच्या पडद्याच्या आत दडून त्यांचा एकच गोलघुमट झालेला दिसायचा. रामदेव बाबांची वाणी त्यांनी दाखवलेल्या योगासनांपेक्षाही जबरदस्त होती. "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती उपकारे।।" या संतवाणीचे जीवंत उदाहरणच आपण सादर करीत आहोत असा आव ते आणत होते. त्यांच्या सांगण्यात अचाट आत्मविश्वास होता. भसाभसा उछ्वास टाकत कपालभाती प्राणायाम दाखवतांना "साँस बाहर फेकते समय उसके साथ अपने शरीरमेसे सभी रोगोंको और रोगजंतुओंको बाहर फेक दो। जल्दही सभी बीमारियोंसे मुक्त हो जाओगे।" अशा प्रकारची त्यांनी केलेली फेकाफेक ऐकल्यानंतर तो कार्यक्रम पुन्हा पहाण्याची गरज नाही असे मी माझ्यापुरते ठरवले. पण इतर लोकांवर बाबांची जबरदस्त मोहिनी पडतच होती. त्यांचे टीव्हीवरले कार्यक्रम कमी होते की काय, लोकांनी त्याच्या सीडी आणल्या आणि त्या पाहणे सुरू केले. निरनिराळ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांवर त्यांची योगसाधनेची भव्य शिबिरे भरत आणि हजारो लोक त्यात भाग घेऊ लागले. पाहता पाहता बाबा रामदेव प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोचले. त्यांच्या नावाने अनेक आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारी दुकाने देशभरातल्या सगळ्या शहरातच नव्हे तर सगळ्या उपनगरांमध्ये उघडली गेली.

जवळ जवळ दररोज त्यांच्यासंबंधित एकादी तरी बातमी येतच राहिली. अत्यंत विवादास्पद (काँट्रोव्हर्शियल) विधाने करण्यात ते प्रवीण आहेत. ते जे काही बोलतील ते लगेच टिपून त्याला आणखी तिखटमीठ लावून त्याला मोठ्या मथळ्यासह प्रसिद्धी द्यायचीच असे अनेक वृत्तसंस्थांनी ठरवले असावे. त्यावर मग कोणी ना कोणी टीका करतात किंवा त्यांची तळी उचलून धरतात, त्यावर आणखी प्रतिक्रिया येतात, त्यामुळे बाबा रामदेवांचे नाव आणि फोटो सतत डोळ्यापुढे येतच राहिले. शिवाय त्यांच्या आश्रमाबद्दल, त्यांच्या पट्टशिष्याबद्दल काही ना काही छापून येतच असते, बहुतेक वेळा ते गौरवास्पद नसले तरी "हुवे बदनाम तो क्या नाम नही हुवा?" अशा प्रकारे त्यांना मिळणा-या प्रसिद्धीत भर पडतच राहिली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात चाललेल्या आंदोलनात मोठ्या दिमाखात उडी घेतली, त्यानंतर पोलिसांची कारवाई, बाबांचे पलायन, प्रकट होणे वगैरेंनी राजकीय रंगभूमीवरले एक प्रकारचे थरारनाट्य निर्माण केले होते. शिवाय परदेशात कस्टम्सने केलेली अडवणूक वगैरे आणखी काही अध्याय त्याला जोडले गेले.

दोन दिवसांपूर्वी बाबा रामदेवांनी एक नवाच बाँबगोळा टाकला. त्यांनी असे सांगितले की सध्या बत्तीस प्रकारचे डायरेक्ट टॅक्सेस आणि पन्नास साठ प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्सेस यांनी नागरिकांना हैराण केलेले आहे. शिवाय या डोईजड करांमुळे कर चुकवण्याला प्रोत्साहन मिळते, त्यातून भ्रष्टाचार जन्माला येतो आणि काळ्या पैशाचे ढीग तयार होतात, पॅरलल इकॉनॉमी तयार होते. या सगळ्यावर जालिम उपाय म्हणजे सरसकट सगळे कर रद्द करून टाकावेत आणि फक्त एक नवा बँक ट्रँजॅक्शन टॅक्स सुरू करावा. बाबांच्या माहितीप्रमाणे सध्या सगळ्या प्रकारच्या करांमधून जेवढे उत्पन्न सरकारांना मिळते त्याच्या तिप्पट उत्पन्न या एका करामधून त्यांना मिळेल आणि नागरिकांनाही अगदी कमी कर भरावा लागेल. आता जनतेला कर द्यावा लागणार नाही पण सरकारला तो वाढून मिळेल. मग ते पैसे कुठून येणार आहेत? हे गूढ कोण जाणे किंवा ते बाबाच जाणोत. शिवाय ५०० आणि १००० रुपयांच्या सगळ्या नोटा सरळ रद्द कराव्यात. यामुळे देशातला सगळा काळा पैसा अदृष्य होईल. त्याच्या मालकांना परदेशातल्या बँकांमध्ये ठेवलेला पैसा देशात आणावा लागेल आणि तोही सरकारला मिळेल. वगैरे वगैरे.

या विषयावर एनडीटीव्हीवरील अँकर रवीशकुमार यांनी सलग दोन दिवस सकाळी चर्चा घडवून आणल्या. यात काही अर्थशास्त्री, राजकारणी, प्राध्यापक, पत्रकार वगैरेंनी भाग घेतला. खुद्द रामदेव बाबांनीही टेलिकॉन्फरन्सद्वारे त्यात सहभाग घेतला. त्यात त्यांच्या जिलबीसारख्या गोलगोल बोलण्यामधून मला एवढे समजले की त्यांना देशाच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल करायचा आहे. मोठ्या रकमेच्या नोटा आणि सारे टॅक्स रद्द करायचे, त्यात एक्साइज ड्यूटी, कस्टम्स ड्यूटी, जकात, टोल वगैरे कशातले काहीही शिल्लक ठेवायचे नाही. यामुळे असे होईल की टॅक्स चुकवण्याचा प्रयत्नच कोणाला करावा लागणार नाही आणि त्यामुळे भ्रष्टाचार संपून जाईल. या सगळ्या करभरणीसाठी भरावे लागणारे निरनिराळे किचकट फॉर्म्स भरण्यात आणि त्यावर अपील करणे, कोर्टकचे-यात खेटे घालणे वगैरेमध्ये जाणारा सगळ्यांचा वेळ वाचेल. सगळ्या वस्तूंच्या किंमती अर्ध्याहून खाली येतील. सगळे लोक सुखी आणि प्रामाणिक होतील. सुराज्य येण्यासाठी आणखी काय पाहिजे?

देशाचे इतके सगळे भले होऊ घालणारी अशी ही अफलातून सूचना असली तरी 'अर्थक्रांती' नावाची मोहीम चालवणा-या संघाचे एक प्रतिनिधी सोडल्यास त्या पॅनेलमधल्या इतर कोणालाही बाबांचे सांगणे मुळीच पटलेले दिसले नाही. कारण सैन्यदल, पोलिस, न्यायदान, शिक्षण, आरोग्यसेवा वगैरे अनेक अत्यावश्यक कामांसाठी सरकारला पैसे कुठून मिळणार असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यासाठी बाबांच्या या सूचनेला एक पुरवणी होती ती अशी की भारतातल्या प्रत्येक माणसाच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडायचे, त्याला चेकबुक आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड द्यायचे आणि त्यानंतर त्याने पैशाचे सर्व व्यवहार फक्त बँकांमार्फतच करायचे. युरोपअमेरिकेत सध्या ही परिस्थिती ब-याच प्रमाणात अस्तित्वात आलेली आहे. आपला देश तितका प्रगत झाला तर ती इथेही येणे अशक्य नाही. रामदेवबाबांची सूचना अशी आहे की यातल्या प्रत्येक व्यवहारात (ट्रँजॅक्शनमध्ये) बँकेने दोन टक्के रकम ठेऊन घ्यावी आणि त्यातला काही भाग बँकांनी सरकारला देत रहावे. यामधून सरकारांना पुरेसे पैसे उपलब्ध होतील. समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीचा पगार, मजूरी, फी, कमिशन वगैरे त्याचे जे काही उत्पन्न असेल त्यातले दोन टक्के वगळता उरलेले ९८ टक्के पैसे थेट बँकेत जाणार. ते खर्च करतांना घरमालक, रेल्वे, बसकंपनी, टॅक्सी ड्रायव्हर, धोबी, न्हावी वगैरेंना तो जितके पैसे देईल, वीज, पाणी, टेलिफोन वगैरेची जी बिले तो भरेल त्या सगळ्यामधले दोन टक्के बँक ठेवून घेईल, बाजारातून जे सामान, ज्या वस्तू तो विकत आणेल त्यांच्या किंमतीमधले दोन टक्के कापून उरलेले दुकानदाराला मिळतील. त्या माणसाने कोणत्याही कारणासाठी आपल्या मुलाला, पत्नीला, भावाबहिणींना किंवा आईवडिलांना पैसे द्यायचे असले तरी ते त्यांच्या खात्यात जमा करतांना त्यातले दोन टक्के बँक कापून घेईल.

म्हणजे नागरिकाने पैसे कमावतांना त्यातले दोन टक्के बँक घेईल त्याचप्रमाणे ते खर्च करतांना ती पुन्हा दोन टक्के घेईल असे असले तरी उरलेले ९६ टक्के त्याच्या खर्चासाठी उरले तरी काय हरकत आहे? इतर कुठलाच टॅक्स बरायचा नसला तर हा सौदा फायद्याचाच होणार हे ऐकायला बरे वाटते, पण ते तितके सरळ सोपे असणार नाही. जे लोक पंचवीस तीस टक्के आयकर भरतात अशा संपन्न लोकांना कदाचित त्याचा फायदा होईलही, पण त्यांची संख्या फक्त २-३ टक्केच असेल. बहुसंख्य जनता सध्या इनकमटॅक्स भरतच नाही, पण त्यांनासुद्धा आता हा बँक ट्रँजॅक्शन टॅक्स मात्र भरावाच लागेल, म्हणजे तो त्यांच्याकडून परस्पर कापून घेतला जाईल. व्यापार किंवा उद्योगधंद्यामध्ये कच्च्या मालाचा मूळ उत्पादक आणि पक्का माल विकणारा किरकोळ व्यापारी यांच्या दरम्यान अनेक मध्यस्थ कड्या असतात, अनेक वाहतूकदार असतात. यातल्या प्रत्येकाला स्वतःचे उत्पन्न कमी होऊ द्यायचे नसणार. यामुळे ते वसूल करून त्याखेरीज हा कराचा बोजा पुढल्या कडीवर ढकलावा लागणार. म्हणजे मालाच्या विक्रीची किंमत वाढत जाणार.

शेअर मार्केटमधले दलाल अगदी क्षुल्लक कमिशन आकारतात, पण खरेदीविक्रीच्या प्रत्येक व्यवहारामध्ये दोन दोन टक्के बँकेला द्यायचे असतील तर ते व्यवहार ठप्प होतील, निदान अगदी कमी होतील. बँकेकडून कर्ज घेतले तर त्यातले ९८ टक्केच हातात येतील आणि ते परत करतांना त्याने दिलेल्या रकमेच्या ९८ टक्केच बँकेला मिळतील. बँकेने दिलेले पूर्ण पैसे व्याजासह परत मिळायचे असल्यास तिला व्याजाचा दर जास्त लावावा लागणार. यामुळे उत्पादनखर्च वाढत जाणार. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जमा आणि खर्चाचा प्रत्येक व्यवहार बँकेच्या माध्यमामधूनच होणार असल्यास बँकांच्या कामाचा व्याप आणि खर्च अनेकपटीने वाढेल. ते करणे शक्यतेच्या कोटीतले तरी आहे की नाही हा एक प्रश्न आहेच. शिवाय तो भागवण्यासाठी बँकेने कापलेल्या दोन टक्क्यामधले पुरेसे पैसे ठेवून घेणे तिला भाग पडेल. उरलेल्या पैशातला किती हिस्सा केंद्र सरकारला, किती राज्य सरकारला, किती स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायचा हे कोण आणि कसे ठरवणार? त्या बाबतीत सबघोडे बारा टक्के करून कसे चालेल? प्रत्येक राज्याच्या आणि शहराच्या समस्या आणि गरजा वेगळ्या असतात, त्यासाठी लागणारा खर्च निराळा असतो. त्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा हे सध्या राज्य सरकारे किंवा महापालिका ठरवतात. रामदेवबाबांच्या योजनेत ते कसे बसवायचे?

याशिवाय आपल्या लोकल्याणकारी राज्याला समाजाच्या विकासासाठी बरीच कामे करावी लागतात. त्यासाठी धोरणे आखतांना त्यावर किती खर्च करायचा आमि तो निधी कुणाकडून आणि कसा गोळा करायचा याचा विचार करावा लागतो. या बाबतीत काही गैरव्यवहार होतात असे असले तरी ते थांबवून टाकणे हा त्यावर उपाय असू शकत नाही. हे आणि अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले गेले त्यावर बाबांनी शुद्ध टोलवाटोलवी केली. "सध्या देशात इतका भ्रष्टाचार आहे, इतकी अनागोंदी आहे, इतका काळा पैसा देशात आणि देशाबाहेर आहे. परिस्थिती आताच इतकी वाईट आहे, याहून आणखी वाईट काय होऊ शकणार आहे?" अशा प्रकारची उत्तरे ते देत राहिले. अखेर ते सध्या ज्या भाजपाचे समर्थन करत आहेत तो पक्ष तरी त्यांची ही नवी अर्थनीती मान्य करून अंमलात आणणार आहे का? या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली. सध्याच्या करप्रणालीत अनेक दोष आहेत, ते दूर करणे त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे यात शंका नाही. त्या दृष्टीने काही पावले टाकली जात आहेत, आणखी बरेच करायला पाहिजे हे देखील मान्य करता येईल, पण ती चौकटच मोडून टाकायची हे भयानक वाटते.

करआकारणी करतांना तो भरण्याची केवढी कुवत कुणाकडे आहे आणि खर्च करतांना त्याचा लाभ कुणाला आणि किती मिळणार आहे याचा विचार करून निर्णय घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणी होते. असे आजवर जगभरात सर्व राष्ट्रांमध्ये होत आले आहे. फक्त खनिज तेलापासूनच गडगंज पैसे मिळवणा-या अरब राष्ट्रांना कदाचित नागरिकांकडून कर घेण्याची गरज वाटत नसेल. आपली परिस्थिती तशी नाही. आपल्या देशाच्या गरजा इथल्या नागरिकांनीच भागवायच्या आहेत. रामदेवबाबांनी सुचवलेला करमुक्तीचा प्रयोग याआधी कुठे केला गेला आहे का? किंवा सध्या केला जात आहे का? त्याचे काय परिणाम झाले? अशा प्रश्नांना बगल देतांना "तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते शोधून काढा. आपला देश स्वतंत्र आहे, आपण इतरांकडे कशाला पहायला पाहिजे?" अशी उत्तरे मिळाली. 'आउट ऑफ दि बॉक्स' विचार करणा-यांबद्दल मलासुद्धा आदर वाटतो. पण इतक्या अव्यवहार्य योजना विचारात घेण्यालायक वाटत नाहीत. अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना सरसकट  मोडीत काढणारे हे 'अनर्थयोगशास्त्र' कुणाकुणाला पटणार आहे आणि कायद्याच्या चौकटीत ते कसे काय बसणार आहे हे पहायचे आहे.     

by Anand Ghare (noreply@blogger.com) at January 09, 2014 04:27 PM

बाबांचे अनर्थयोगशास्त्र

दहा वर्षांपूर्वी आस्था नावाच्या चॅनेलवर एक कार्यक्रम सुरू झाला आणि अल्पावधीत त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्या कार्यक्रमात योगासने आणि प्राणायाम वगैरे दाखवत असत. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम मी ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या काळापासून अधून मधून पाहिले होते. त्यातले काही सुमार तर काही उत्तम असत पण "ज्यांना अमके अमके व्याधीविकार आहेत किंवा ज्यांचे वय इतक्याहून ...

पुढे वाचा

by Anand Ghare at January 09, 2014 04:27 PM

नोंदी सिद्धारामच्या...

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

विज्ञान आणि अध्यात्म, युवा विचार आणि बुजुर्ग चिंतन अशा कित्येक द्वंद्वांचा अद्भुत संगम म्हणजे स्वामी विवेकानंद. 12 जानेवारीला स्वामीजींची 151 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त..

सिद्धाराम भै. पाटील, सोलापूरजगाने आजवर पाहिलेले उदात्त विचार आणि महान संस्कृतीचे स्वामी विवेकानंद हे प्रतिनिधी होते. अज्ञान, अंधर्शद्धा आणि खुळचट समजुतींच्या चिखलात खितपत पडलेला देश अशी भारताची प्रतिमा झाली होती; परंतु विवेकानंदांनी सिद्ध करून दाखवले की, भारत ही सर्वाधिक विकसित संस्कृती असलेली आणि परिपूर्ण तत्त्वज्ञान लाभलेली भूमी आहे. प्रागतिक विचारांची विशालता आणि उदात्त परंपरा यांचा सुरेख संगम स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.

स्वामी विवेकानंदांनी पाश्?चात्त्य आणि पौर्वात्य विचारधारांचे विविध प्रवाह सारख्या प्रमाणात आत्मसात केले होते. ते पूर्णपणे देशभक्त होते आणि ख?र्‍या अर्थाने या जगाचे नागरिकसुद्धा. खरे तर यात विरोधाभास काहीच नाही. कारण ते संपूर्ण चराचरात एकत्व पाहणा?र्‍या भारतीय तत्त्वज्ञानाचे दूत होते. विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता.
स्वामी विवेकानंदांनी निकोलस टेस्ला, जगदीशचंद्र बसू यांच्यासह अनेक जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांना प्रेरित केल्याचे दिसते. ‘राजयोग’सारख्या ग्रंथामध्ये स्वामीजींनी अनेक विज्ञाननिष्ठ उदाहरणे दिली आहेत. दूषित पाण्यापासून होणा?र्‍या आजारांची माहिती सांगून पाणी शुद्ध करण्यासाठीच्या नवीन संशोधनाची माहितीही स्वामीजी गुरुबंधूंना पत्रांतून देतात.
भारताने पाश्?चात्त्यांकडून विज्ञान शिकायचे आहे आणि भारताने जगाला अध्यात्म द्यायचे आहे, असेही स्वामीजी सांगतात. ते म्हणतात, ‘अध्यात्माचा संदेश देणे म्हणजे तत्त्वज्ञान देणे आहे. आपण वर्षानुवर्षे छातीशी कवटाळून बसलो आहोत त्या अंधर्शद्धा आणि रूढी देणे नव्हे. त्या आपल्याला आपल्या देशातही नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत.’ (खंड 3, पृष्ठ 277-278)
मद्रास विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी बोलताना ते म्हणाले की, ‘हे सांगण्याची गरज वाटत नाही की, पाश्?चात्त्य देशातल्या आधुनिक संशोधकांनीही भौतिक साधनांच्या मदतीने या विश्?वाचे एकत्व कसे सिद्ध केलेले आहे. भौतिकशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाले तर तुम्ही आणि मी, सूर्य, चंद्र, तारे हे या जड वस्तूंनी बनलेल्या अनंत महासागरातल्या लाटा किंवा तरंग आहोत हे तुम्हाला माहीत आहेच. अगदी आपल्या पूर्वजांनीही असेच म्हटले आहे. हे शरीर, हे मन ही केवळ नावे आहेत किंवा या जड जगतरूपी सागरातले छोटे तरंग आहेत. सृष्टीची रूपे आहेत. वेदांतानेही असेच दाखवून दिले आहे की, या सगळ्या एकत्वाच्या आविष्कारामागे असलेला खरा आत्मा एकच आहे. या विश्वात एकच आत्मा आहे. सारे काही एकच अस्तित्व आहे. ही ख?र्‍या आणि मूलभूत एकत्वाची कल्पनाच जगाला आपल्याकडून हवी आहे. भारतातल्या मूक जनसमुदायाला हीच जीवनदायी कल्पना त्यांच्या उत्कर्षासाठी हवी आहे. या कल्पनेचा व्यवहारात अंमल, उपयोजन आणि प्रभावी प्रयोग केल्याशिवाय कोणालाही या पवित्र भूमीचे पुनरुज्जीवन करता येणार नाही.’ (खंड 3, पृष्ठ 188-189)
स्वामीजी आपल्याला सांगतात की, आधुनिक विज्ञानातले आणि वेदांतातले निष्कर्ष सारखेच आहेत. यातले वेदांतातले निष्कर्ष फार वर्षांपूर्वी काढले गेले आहेत, तर आधुनिक शास्त्रात ते जडवादी भाषेत लिहिले गेले आहेत. या ठिकाणी वेदांताचा आधुनिक वैज्ञानिक मनापेक्षा अधिक तर्कशुद्ध असल्याचा दावा खरा ठरतो. सध्याच्या युगातल्या काही पाश्?चात्त्य शास्त्रज्ञांनी, वेदांतातील निष्कर्ष कसे आश्?चर्यकारक तर्कशुद्ध आहेत, हे माझ्याशी बोलताना प्रतिपादन केले आहे. त्यातला एक शास्त्रज्ञ तर अहोरात्र प्रयोगशाळेत गुंतलेला असतानाही वेदांतावरची प्रवचने ऐकण्यासाठी वेळ काढत असल्याची आठवण स्वामीजी सांगत असत. वेदांतातील निष्कर्ष आधुनिक काळातल्या आशा, आकांक्षांशी सूर जुळवणारे आहेतच. पण, विज्ञानातील निष्कर्षांशी मिळतेजुळतेही आहेत. (खंड 3, पृष्ठ 185)
23 नोव्हेंबर 1898 ला जमशेदजी टाटा यांनी विवेकानंदांना पत्र लिहिले. भारतातील विज्ञान संशोधन संस्थेचे नेतृत्व विवेकानंदांनी करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. (टू टेक द लीडरशिप ऑफ अ रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सायन्स इन इंडिया) हीच संस्था पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू या नावाने प्रसिद्धीस आली. जमशेदजी व विवेकानंदांनी 1893 मध्ये जपान ते अमेरिका सोबत प्रवास केला होता. जमशेदजी हे पोलाद उद्योग भारतात आणण्याच्या ध्येयाने पछाडले होते. विवेकानंदांनी त्यांना सुचवले की, फक्त साधनसामग्री आणून चालणार नाही, तर तुम्हाला ‘साधनसामग्रीचे तंत्रज्ञान भारतातच उभे करता आले पाहिजे.’ म्हणून जमशेदजी आध्यात्मिक प्रेरणा विज्ञानात आणू इच्छित होते. त्यांनी विवेकानंदांना पाठवलेल्या आमंत्रणपत्रात म्हटले आहे, (विज्ञान संशोधन संस्था उभी करण्यासाठी) ‘ही योजना यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्याशिवाय दुसरे नाव आता माझ्यापुढे नाही.’
स्वामी विवेकानंदांनी हॉर्वर्ड विद्यापीठात 25 मार्च 1896 रोजी दिलेले व्याख्यान आधुनिक युवकांसाठी हिंदू धर्मग्रंथाचा सारांश म्हणावा लागेल.
स्वामी विवेकानंदांनी 100 वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे आधुनिक विज्ञानात (सापेक्षवादाचा सिद्धांत असो किंवा विश्?व उत्पत्तीचा नियम) अद्वैत वेदांताच्या विरोधी असे काहीही नाही. ही एक कुतूहलाची बाब आहे की, निर्जीव वस्तूमधील अणु, दूरवर असलेली आकाशगंगा आणि आपले अस्तित्व हे सर्व एकाच नियमाने नियंत्रित आहेत. सगळीकडे एकच अस्तित्व आहे, हा वेदांताचा गाभा आहे. प्रत्येक जीव हा पूर्ण आहे. त्या अस्तित्वाचा एखादा तुकडा नव्हे, असे स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट केले आहे.
(लेखासाठी संदर्भ : 1. भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांचा ‘युवा भारती’ या नियतकालिकातील लेख. 2. माता अमृतानंदमयी यांचा ‘विवेक विचार’ या मासिकातील लेख. 3. स्वामी विवेकानंद समग्र वाड्मय, खंड 3)

by siddharam Bhairappa patil (noreply@blogger.com) at January 09, 2014 02:16 PM

[गुंतवणूक आणि करप्रणाली] आर्थिक वर्ष अखेर

जानेवारी महिना उजाडला. जानेवारी म्हणजे आर्थिक वर्ष अखेरीची जाणीव होणे सुरू होते. आता विविध कंपन्यांमधून कर मोजणीकरीता त्यांच्या कर्मचार्‍यांकडून त्यांनी  केलेल्या गुंतवणूकीची कागदपत्रे मागण्यास सुरूवात होईल, किंबहुना झालीही असेल. ज्यांनी ती कागदपत्रे तयार ठेवली असतील त्यांच्याकरीता चांगले. पण ज्यांची कागदपत्रे तयार नसतील किंवा गुंतवणूकच केली नसेल त्यांनी ...

पुढे वाचा

by देवदत्त at January 09, 2014 12:03 PM

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

अर्थक्षेत्र भाग - ७ - "ट्रेंड" ते "ट्रेड" (अ)

कालच, बच्चे कंपनीला हॉटेलात हादडायची हुक्की आली आणि सौ पण त्यात सामील झाल्या. पुढच्या २० व्या मिनिटाला अस्मादिक हॉटेलातल्या एका कोपर्यात बापुडवाणे मेन्यू कार्ड न्याहाळत बसले होते. एरवी "यवनांना" (यौवंनांना ना ऽ ऽ ही. ) कितीही नावे ठेवली तरी हॉटेलात मेन्यू कार्ड यवन तत्वानेच वाचावे लागते. मग ४०-६५-१३५-१४५-१८५-२२५-२८५-६५-१३५-१४५-१३५-१३५ असे सुरु होते. मग उजव्याबाजूला सौ. किमतीचे वाचन आणि डाव्याबाजूला मुलांचा पदार्थ वाचन असा कल्ला सुरु असतो.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

by ज्ञानव at January 09, 2014 11:39 AM

संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]

११८५. स्वतःप्रमाणं परतःप्रमाणं कीराङ्गना यत्र गिरो गिरन्ति |

द्वारस्थनीडान्तरसंनिविष्टा जानीहि तत्पण्डितमण्डनौकः  ||

अर्थ

[शंकराचार्यांनी मंडन मिश्र या पंडिताच घर कुठाय असा प्रश्न नदीवरच्या स्त्रियांना विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर] ज्या घराच्या दरवाज्यात असलेल्या पिंजऱ्यातील पोपट [शब्दशः पोपटाच्या माद्या] स्वतः प्रमाण;  परत: प्रमाण [सांख्य दर्शनातील पारिभाषिक शब्द] असं बडबडत असतील ते पण्डित मंडन मिश्रांच घर आहे असं तुम्ही समजा. [त्या पंडिताकडे सतत असेच संवाद होत असल्यामुळे अनुकरणशील पोपट अर्थ न समजतासुद्धा ती भाषा बोलत होते.]

by मिलिंद दिवेकर (noreply@blogger.com) at January 09, 2014 11:30 AM

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

माझे पंतप्रधान[पदाच्या उमेदवारां(भाग: २/३)]वरील आक्षेप

गेल्या भागात (भाग १) सद्य/मावळत्या पंतप्रधानांवरील आक्षेप बघितले. या व यापुढील भागात आपण पंतप्रधानपदाचे एकमेव अधिकृतरीत्या घोषित उमेदवार श्री.नरेंद्र मोदी तसेच इतर संभाव्य शक्यता/इच्छुक जसे सर्वश्री राहुल गांधी, मुलायमसिंह यादव, शरद पवार, जयललिता, नितीश कुमार व अरविंद केजरीवाल यांच्यावरील माझ्या आक्षेपांची चर्चा करणार आहोत.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

by ऋषिकेश at January 09, 2014 08:34 AM

gappa

Techno Militants


There comes a time in the lives of humans, when  the excessive sparkle of technology,  blinds. Not just the eyes, but more so, the brain.

Early on in our lives, or should I say, my life, the technology I used , was , to say the least , personalised.  Meaning, that the component of technology that  was designed , based on my actual personal preference,  was non trivial.

Electronics was in its nascent days. Elsewhere across the world, it had rushed  around by leaps and bounds, but thanks to our economic and other rules, we were late starters. Electronics afforded you a way to enjoy leisure times.  Sometimes, things like telephones, were , of course, great conveniences, but they were never , personal or even family accessories.  Mixers and blenders were on the horizon, but they were a luxury , and we still swear by the chutney ground on the stone, and the buttermilk churned with a "ravi", all at non life threatening speeds.  There was a sense of values-in-what-we-traditionally-had, combined with a sense of quiet wonder about what was on the horizon. Very slowly, convenience won out. Bicycles became complicated and posh. Cycling to work in fresh air got replaced by stationery bikes pedalled to the tune of some hit songs in a big hall full of sweaty people .

The real problem arose, when technology started entering the personal realm. It was now a question of technology influencing , not just the eyes, but the brain.

Visual technology perfected for television combined with entities employed to fool people , started affecting the way folks thought.  Ethics fell by the wayside,  as  folks agonized over being unable to fit into clothes that were not meant for them anyway. Young girls  lost sleep over the shape of their nose, and their inabilities to match up with vital statistics of people they saw all the time on screen. Medical specialities proliferated and some folks  made , and continue to make a career out of  chopping and changing  the original product, with a nip here and  tuck there,  sometimes big cuts,  giving "sculpture" a new meaning.

 The problem arises today, because technology is now used to fool the mind. Fooled, to believe, that  there are hierarchies, binary standards, and there is a non trivial probability of you falling by the wayside, if you don't fit yourself in.

In an outstanding example of how minds can be weakened,   little girls look on wide eyed, as they are bombarded  with one photographically overexposed face after another on television, ignoring camera tricks, applauding fairness.  In complexion, that is.

Young boys, look on goggle eyed, as a fellow sprays stuff on himself, and  is suddenly overcome with female visitors, whose parents clearly are not aware of their whereabouts and activities. Success, as shown, is almost always attributable to beautiful faces, and never mind things like common sense, intelligence and ability to put in hard work.

And it doesn't help, that  we are a land of people with a diverse mix of religions, colors and physical statures.  We always were, and were actually comfortable in our own skins,  but then technology happened, and we've never been able to reverse the effects of that perturbation.  And it has certainly not helped, that parental attention has simply not been the same, since the economy has forced both parents into the workplace.

It has been an uphill task, to shore up the self esteem of a child , who doesn't fit in, at birth , into the color scheme of things.  Sometimes , excelling at some activity as a youngster , being applauded by ones peers, and being singled out for praise at school etc, helps; but it takes a lot out of parents and extended family (if it is available)  to keep at it for large periods of time and reach such a stage.

This, combined with a wilful shuteye towards the bad side effects of a  technology for so called enhancement,  has only meant more unsolvable worries later on   Watch the beauty pageants. Read about chemicals used to lighten skin.  Read about unchecked advertisements for diet pills, some with known cardiac side effects.  Not just women, but young men and boys, emulating half knowledge elders  taking steroids and stuff in a hurry to get there. Read the skin whitening entry in Wikipedia.   

We are a society that has given in to the technology militants. Technology being used to spread certain ways of thinking, and spreading selective information to mislead us. Science is no longer important. Your ability to fool someone , makes you smart.  And so ,we have a government that allows , completely misleading ads on television, including those hitherto banned liquor ads, where the stuff is called Casettes and CD's or soda, followed by a winking hollywood actor.  The list is endless.

I just read this post.  It brings back to my mind some one's similar hurtful experiences.

I've met the little girl in the above post.  And her joie-de-vivre , sparkle ,  shining  face and innovative logic,  would actually start a new slogan about chocolate , beauty, and  growing up  smart.

I hope she grows up and starts her own set up. And makes sensible ad-films. And gives some wonderful talks and speeches, as well as writes great books. And inspires lots of little girls and their mothers.  And gets applauded, for changing the way people think.

It is easy for me to say . It is difficult, but doable.

Her parents run the marathon every year.

I am sure, she will run hers.  And complete hers too.  Brilliantly......  

  

      

   

by Ugich Konitari (noreply@blogger.com) at January 09, 2014 05:30 AM

मिसळपाव - मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती Marathi People Marathi Forum in Marathi Language!

गेटींग (पेड) न्यूज, गेटींग पेड (न्यूज) लेख कसा वाचला (कसे वाचता) ?

फर्स्टपोस्टडॉटकॉमवर पेड न्यूज या विषयावरील लेखाचा हा दुवा तो लेख आणि वाचकांच्या प्रतिक्रीया दोन्ही वाचनीय वाटल्या.

काथ्याकूटाचा विषय आहे :

गेटींग (पेड) न्यूज, गेटींग पेड (न्यूज) लेख कसा वाचला (कसे वाचता) ?

by माहितगार at January 09, 2014 05:15 AM

ज्योतिष ही अंधश्रद्धा - डॉ वेंकटरामन

'भारत विकासाच्या वाटेवर जात असताना नशिबावर विश्‍वास ठेवत जातो. सरकार, राजकारणी याच विचारसरणीला पाठबळ देत आहेत, हे दुदैवच म्हणावे लागेल. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत भविष्य वर्तविण्यात येते. ज्योतिषशास्त्र ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने ते शास्त्रही नाही,''असे मत "नोबेल'विजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. वेंकटरामन रामकृष्णन ...

पुढे वाचा

by Prakash Ghatpande at January 09, 2014 04:42 AM

एम. डी. रामटेके.

राजू शेट्टी : एका शेतक-याची राजकीय आत्महत्या!

रामदास आठवलेनी जातीयवादी पक्षाच्या गोटात शिरून राजकीय आत्महत्या केली. समस्त आंबेडकरी समाजाशी गद्दारी करत भगव्यांच्या दारात भिक्षा पात्र घेऊन उभा असलेला रामदास रामाचे दास्य करण्या वाचून अजुन काही करु शकणार नाही हेच खरे. पण त्याच्य जोडीला शेतक-याचा नेता म्हणविनारा राजू शेट्टी यानी आज वाज्या गाज्यात संघाची चड्डी घातली अन समस्त शेतक-यानी तोंडात बोटं घातली. जातीयवाद्याच्या गोटात शिरुन पुरोगाम्यांशी लढण्याचा विचार करणारे हे राजकीय रातकिडे शेवटी संघाचा सूर लावणारे जातकिडे निघाले.  भारतीय राजकारणाला भ्रष्टाचाराची कीड लागली म्हणून दिवस रात्र तार स्वरात हिंडणारे संघाचे नि सेनेचे जातकिडे हे विसरतात की स्टींग ऑपरेशनद्वारे भ्रष्टाचाराचे बुरखे फाडण्याची सुरुवात तुमच्याच एका नेत्यापासून झाली होती. स्वच्छ प्रतिमेचा आव आणणारे व प्रगतीचे गाण गाणारे भगवे हे विसरतात की नितीन गडकरीच्या पुर्ती समूहातील प्रचंड घोटाळे व गोपिनाथ मुंडेच्या जिभेतून  निसटलेले निवडणूकीचे कोटीचे आकडॆ म्हणजे समस्त भगव्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. तरीही मेरी ही लाल म्हणत माकड उड्या मारणारे चड्डीवाले व त्यांचे लाल टिळ्याचे सोंगाळे बाता काय मारतात तर म्हणे यांचा लढा स्वच्छ प्रतिमेच्या आग्रहासाठी व देशाच्या विकासासाठी आहे.
चला एकदा माणून चालू की ही लोकं आर्थिक विकास साधून दाखवतीलही... पण आर्थीक प्रगती म्हणजे समाजाचा विकास होय का? अजिबात नाही. सामाजीक वातावरण दहशतीचं असल्यावर पैसा कोण्या कामाचा? आर्थिक विकास ही माणसाची जणू एकमेव गरज असून तो प्रश्न सुटला की सगळे प्रश्न सुटतात असा आवा आणणारे हे भगवे सामाजीक सुरक्षितते बद्दल ब्र शब्द बोलत नाही.  माणसाकडे पैसा नसतानाही वा अत्यल्प पैशातही तो सुखानी जगू शकतो. कारण पैसा हा गरजांशी निगडीत असून गरजांशी तोडजोड करत जगणे माणसाला चांगलेच ठाऊक आहे. पण मानवी हक्क नाकारात जातीयवाद बोकाळला गेला व उरात धडकी भरणारी दहशत घेऊन एखादा माणूस चैनीने झोपू शकेल का? अशक्य आहे. मग आजचे हे भगवे जे विकासाच्या बाता मारत आहेत यांच्या एकुण मनोवृत्तीचा ज्याना अंदाज आहे त्याना हे चांगलेच माहीत आहे की भगवा राज्य म्हणजे दहशतीचे राज्य. आज उभा गुजरात दहशतीत जगतो आहे. तिथला दलीत व मुस्लीम संवर्णांच्यापुढे गुलामा सारखा वागतो आहे. आर्थिक विकास साधलेल्या(?) गुजरातेतील दहशतीत जगणा-या माणसांच्या आयुष्यातील ही पोकळी कुठल्याही पैशानी भरुन निघणार नाही. पण अगदी याच्या उलट महाराष्ट्रातील तळागळातला माणूस पैशानी थोडं मागे असला तरी भगव्या दहशती पासून तो मुक्त आहे ही जमेची बाजू नाही का? की आर्थीक विकासाच्या नावाखाली भगवी दहशत विकत घ्यायची?
यावेळी नरेंद्र मोदीनी मुंबईत सभा घेतली तेंव्हा एका शब्दानी हिंदूत्वाचा मुद्दा काढला नाही.  पण अगदी याच्या उलट तिकडे उत्तर प्रदेशात मात्र प्रत्येक सभेतून हिंद्त्वाच्या गर्जना होताना दिसतात. याचा अर्थ काय? याचाच अर्थ असा की ईथल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेतून माणसाचा वैचारीक विकास झाला हे त्याना कळले. म्हणजेच इथल्या शासनानी निव्वड आर्थीक विकासच नाही तर  माणसाचा वैचारीक विकास घडवला असून तो कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पुरोगामी धोरणाचा परिणाम आहे हे मोदी व समस्त भगवे जाणून होते. देशातील इतर भागातील मतदार अशा पुरोगामी शासनाच्या अभावामुळे आजही मुर्ख असून तिकडे हिंदूत्वाचा मुद्दा रेटता येतो व तो खपतो सुद्धा. पण महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राजकारणाच्या पलिकडे जाऊन फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा फुलविला व त्यातून पुरोगामी माणूस निर्माण केला नि जपला आहे. त्या पुरोगामी माणसापुढे आंधळे व भगवे मुद्दे उभे करायला मुंबईच्या सभेत मोदीची छाती झाली नाही ही आहे ख-या अर्थाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची कमाई....

आता थोडसं राजु शेट्टी बद्दल:
राजु शेट्टीला आपण सगळे शेतक-यांचा नेता म्हणून ओळखतो. एवढेच नव्हे तर शेतक-यांसाठी लाठ्या काठ्या खात राजू शेट्टीने जी चळवळ उभी केली  त्यातून शिवार ते संसद असा दैदिप्यमान प्रवास करुन आज राजू शेट्टी खासदार बनले... किंबहुना लोकानी त्याना बनविले. असे हे राजू शेट्टी नेमके आले कुठून तर... शरद जोशींच्या शेतकरी चळवळीतून आले. शरद जोशी स्वत:ला पुरोगामी मानत असत व सेना-भाजपाला ते नेहमी "जातीयवादी गिधाडं" असं संबोधत असत. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहीला. पण एक दिवस जोशींचा बुरखा टरकन फाटला व ते सेना-भाजपाला पाठिंबा दयायला निघाले. यावरुन राजून शेट्टीनी विरोध दर्शविला. फुले-शाहू-आंबेडकराचा पुरोगामी विचार जपणारा राजू शेट्टी आपल्या गुरुवरच उलटला व जातीयवादी गिधाडाशी मैत्री नको म्हणत वेगळी चूल मांडली. राजू शेट्टीच्या या स्वाभिमानी व बाणेदार कृतीला मुजरा करत पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य माणूस आता राजू शेट्टीच्या पाठीशी उभा झाला. त्यातून उदय झाला राजू शेट्टी नावाच्या नवा झंझावाताचा... पण आज जरासं पक्ष स्थिरावल्यावर हाच राजू शेट्टी त्याच जुन्या गिधाडांशी मैत्री करायला निघाला ज्यांच्या विरोधात दंड थोपटून स्वत:चं राजकीय अस्तित्व उभारलं होतं. म्हणजे पुरोगामीत्वाचा आव निव्वड पक्ष बळकटीसाठी आणला होता एवढेच... व कालची जातीयवादी गिधाडं आज राजू शेट्टी याना अचानक मित्र वाटू लागली आहेत... हा झाला राजू शेट्टी यांचा संक्षिप्त  इतिहास. 


आता परत सेना भाजपचं काय ते बघू. मुंबईच्या सभेत महार्जना करताना मोदीच्या घषात अडकलेला हिंदूत्व म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या  अथक परिश्रमातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरुगामीत्वाची पावती होती. कारण मोदी व सेना-भाजप हे चांगल्या प्रकारे जाणतात की इथला माणूस कसा आहे. अन राजू शेट्टी अशा पुरोगामी महाराष्ट्राला भगव्यांच्या दावणीला बांधायला निघाले या सारखी लज्जस्पद गोष्ट नाही. अत्यंत भ्रष्ट अशा भाजप-सेनेचे पाय चाटत हेच ते अमृत व तिर्थ आहे म्हणून गुणगाण गाणारे दास व शेतक-यांचे बाप्पे ख-या अर्थाने स्वताचाच घात करत आहेत. या पुरोगामी महाराष्ट्राला खोट्या व बनावट  विकासाची भुरळ पडेल असे दिसत नाही. पण दुर्दैवाने पडलीच तर भगव्या दहशतीचे व जातीयवादाचे चटके बसल्या शिवाय राहणार नाही. किंवा एकेकाळच्राया राजू शेट्टीच्या भाषेत सांगायचे तर ही जातीयवादी गिधाडं आमचे लचके तोडणार.   शेट्टी हे शेतक-यांचे नेते आहेत. इथला शेतकरी आत्महत्या करतोय हे आपण नेहमी वाचत आलोय. आज राजू शेट्टीने महायुतीत प्रवेश केल्यावर मी एवढेच म्हणेण... एका शेतक-यानी केली राजकीय आत्महत्या...!!!

by M. D. Ramteke (noreply@blogger.com) at January 09, 2014 04:04 AM

जाणता अजाणता - भाग ३

शंतनुला पहाटेच जाग आली. तन्वी बाजूला नव्हती. अभ्यासिकेतील दिवा चालू होता. डोळे चोळत शंतनू तिथवर गेला. तन्वी टेबललैम्पच्या उजेडात तिच्या वहीत काही नोट्स काढीत होती. "तन्वी, इतक्या सकाळ सकाळी काय लिहितेयस?"शंतनूने तिला विचारलं. तन्वीने वही पुढे केली. मुन्नारच्या स्थलांतरासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टींची ती यादी होती. "आपण गणपतीच्या सुट्टीत ...

पुढे वाचा

by New English School Vasai 1988 Batch at January 09, 2014 03:49 AM

ऐतिहासिक सत्य

एक ऐतिहासिक सत्य !!!!!!!

खोटे बोलणे

लहानग्यांसाठी … पाप

प्रेमी लोकांसाठी …… ...

पुढे वाचा

by vaghesh at January 09, 2014 01:37 AM

January 08, 2014

सचिन निवृत्त होतोय...

सचिन निवृत्त होतोय. घरातल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसे वाटते तसे वाटते आहे. 
  वास्तविक मी स्वतः कधी फार क्रिकेट खेळलो नाही पण पाहिले मात्र भरपूर!! अगदी उद्या वार्षिक परीक्षा असताना देखील आज पूर्ण दिवस क्रिकेट पाहिले. त्यातून मग व्हायचा तो परिणाम वेळोवेळी झालेला आहे. पण त्याची फारशी खंत वाटत नाही. उलट त्यातलेच काही काही सामने तर अगदी आजही पूर्णपणे ...

पुढे वाचा

by निखिल at January 08, 2014 11:38 PM